शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारावरील हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटक

By admin | Updated: April 3, 2017 03:24 IST

खारघर येथे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

नवी मुंबई : खारघर येथे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यात भाजपा आमदाराच्या चुलत भावाचाही समावेश असून सोसायटीच्या वादातून त्यांनी हल्ला केल्याचे उघड झाले आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्हीमधून गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा उलगडा केला आहे.शुक्रवारी खारघर येथे पत्रकार सुधीर सूर्यवंशी व त्यांचे मित्र संतोष फतारे यांच्यावर हल्ल्याची घटना घडली होती. या घटनेच्या तपासाकरिता आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त दिलीप सावंत, सहायक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी व कक्ष दोनचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी तपासाला सुरवात केली होती. तपासादरम्यान सूर्यवंशी राहत असलेल्या कल्पतरू सोसायटी ते घटनास्थळ दरम्यानचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता, काही जण त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यात दिसले. त्यापैकी एका बॉडीबिल्डरचे छायाचित्र काढून पोलिसांनी पनवेलमधील जिममध्ये चौकशी केली असता, मारेकऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार घटनेच्या चोवीस तासांच्या आत पोलिसांनी एकाला पेणमधून तर चौघांना लोणावळा येथून अटक केली. मयूर कृष्णा ठाकूर (३0), आकाश कृष्णा पाटील (२४), अशोक जगन्नाथ भोईर (३0), विश्वास आत्माराम कथारा (३0), अनंता तुकाराम कथारा (२६) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी मयूर हा आ. प्रशांत ठाकूर यांचा चुलत भाऊ आहे, यामागे राजकीय कारण नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मयूर हा सूर्यवंशी यांचा शेजारी असून त्यांच्यात सतत भांडण होत होते. काही दिवसांपूर्वी सोसायटीमध्ये भाजपाची पत्रके वाटताना सूर्यवंशी यांनी विरोध केल्याने देखील त्यांच्यात वाद झाला होता. याच कारणातून त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा सूर्यवंशी यांचा आरोप आहे. सूर्यवंशी यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने मयूरने त्याच्या चार मित्रांना सुपारी दिली होती. यानुसार आकाश, अशोक, विश्वास व आत्माराम यांनी सूर्यवंशी यांना एकांतात गाठून त्यांच्यावर हल्ला केला.