शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पाच पादचाऱ्यांना चिरडले

By admin | Updated: January 23, 2017 03:59 IST

ऊर्जानगर वसाहतीतील नागरिक सकाळच्या वेळेत परिसरात फेरफटका मारीत असताना एका मद्यधुंद मोटारचालकाने पाच

दुर्गापूर (चंद्रपूर) : ऊर्जानगर वसाहतीतील नागरिक सकाळच्या वेळेत परिसरात फेरफटका मारीत असताना एका मद्यधुंद मोटारचालकाने पाच जणांना चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.वसाहतीतून पर्यावरण चौक मार्गे चंद्रपूरकडे येणाऱ्या मार्गावरील रिजेक्ट गेटपर्यंत अनेक नागरिक ‘मॉर्निंग वॉक’ करतात. रविवारी सकाळी ६च्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या फोर्ड इको स्पोर्ट कारने पाच पादचाऱ्यांना ठोकरले. विठ्ठल दडमल (४०), प्रदीप बागमवार (५३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, सुनील तुप्तेवार (४२), भास्कर मुसळे (४०), किशोर ठाकरे (४०) हे तिघे गंभीर जखमी झाले. यातील तुप्तेवार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे तर अन्य जखमीवर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.या अपघातानंतर वाहनचालकाने पळ काढला. मात्र काही अंतरावरच रस्त्याच्या कडेला त्यांची कार आदळली. लागलीच स्थानिक नागरिकांनी कारचालक सचिन येलमुले व बाजूला बसलेला कार मालक पंकज शिंदे या दोघांनाही पकडून ठेवले व नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांनाही अटक केली असून हे दोघेही मद्यधुंद असल्याचे आढळले. मृत, जखमी व आरोपी हे सर्वच वीज केंद्राचे कर्मचारीआहेत. (वार्ताहर)