अमरावती/अहमदनगर/औरंगाबाद: नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, गुरुवारी राज्यात पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आले, तर विदर्भात शेतकरी दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला़ अमरावती जिल्ह्णातील तिवसा तालुक्यातील शेंदूरजनाबाजार येथे रामदास मेश्राम (६८) यांनी बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. पावसाअभावी सोयाबीन करपले. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील नवनाथ काळे (४०) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून काळे यांनी बुधवारी विष घेतले. लातूर जिल्ह्णातील भिसेवाघोली येथे जयद्रथ ज्ञानोबा भिसे (४५) आणि जालना जिल्ह्णातील टाकळी येथे श्रीमंता कुंडलिक गावंडे (५०) यांनी जीवन संपविले़ जयद्रथ भिसे यांंच्यावर सोसायटीसह बँकांचे तसेच खाजगी सावकाराचे दहा लाखांचे कर्ज होते. मंगरूळपीर तालुक्यातील श्रीकृष्ण गुजर (६०) या शेतकऱ्याने शुक्रवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
राज्यात आणखी पाच शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
By admin | Updated: December 19, 2014 04:57 IST