शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाच मांत्रिकांना जेलची हवा

By admin | Updated: April 20, 2015 02:16 IST

शनि अमावास्येच्या मुहूर्तावर भाविकांच्या समस्या निवारणासाठी अंगारे, धुपारे करत अंधश्रद्धेचा बाजार भरवणाऱ्या मांत्रिकांना पोलिसांनी जेलची हवा दाखविली.

विलास भोसले, पाटोदा (जि. बीड)शनि अमावास्येच्या मुहूर्तावर भाविकांच्या समस्या निवारणासाठी अंगारे, धुपारे करत अंधश्रद्धेचा बाजार भरवणाऱ्या मांत्रिकांना पोलिसांनी जेलची हवा दाखविली. शनिवारी दुपारी तालुक्यातील दासखेड येथे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींगनंतर गाशा गुंडाळून पळालेले मांत्रिक रात्री पुन्हा मंदिर परिसरात दाखल झाले आणि मध्यरात्री पोलिसांच्या सापळ्यात अडकले. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे़ अटक केलेल्यांमध्ये लता महादेव खेडकर , आकाश दत्तू बन्सोडे, मीना दत्तू बन्सोडे, आजिनाथ तुळशीराम बटूळे , सखूबाई नवनाथ खेडकर यांचा समावेश आहे. वेताच्या छड्या, लिंबू, सुया, बाहुल्या, दाबण, कणिक असे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले. शनिवारी अमावस्येनिमित्त बाजीबाबा मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. यावेळी काही मांत्रिकांनी भक्तांचे दरबार भरवून त्यांच्यावर मंत्र- तंत्र, जादू, धूप, अंगारे याद्वारे अघोरी उपचार सुरु केले होते. ‘लोकमत’ने हा अमानुष प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. पाटोदा ठाण्याचे पोलिसही तेथे धडकले; पण पोलिसांना पाहून मांत्रिक फरार झाले. त्यानंतर निरीक्षक एस. बी. हुंबे यांनी जमादार अशोक दराडे, राम बारगजे, विलास खरात, भाऊसाहेब आहेर, सुनीता खरमाटे यांच्यासमवेत पुन्हा मध्यरात्री मंदिरावर छापा टाकला. यावेळी मांत्रिकांमार्फत भक्तांंवर अघोरी उपचार सुरु होते. अंधश्रद्धाळू भाविकांना वेताने मारहाण, लिंबू कापणे, अंगात येणे असे अघोरी उपचार सुरु होते. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन जेलची हवा दाखवली. याप्रकरणी रविवारी पहाटे महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)