शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे दूध उत्पादक संस्था अवसायनात

By admin | Updated: December 27, 2016 18:17 IST

शासकीय पातळीवर झाल्याने सद्य:स्थितीत जिल्ह्यातील 96 टक्के दूध उत्पादक सहकारी संस्था भकास झाल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 27 - शेतक-यांना जगवण्याची ताकद असलेल्या दुधाला नासवण्याचे काम राजकीय व शासकीय पातळीवर झाल्याने सद्य:स्थितीत जिल्ह्यातील 96 टक्के दूध उत्पादक सहकारी संस्था भकास झाल्या आहेत. शिवाय वर्षानुवर्षे कायदेशीरबाबींची पूर्तता न केल्यामुळे सहकारी विभागाच्या वतीने या संस्था अवसायनात काढल्या आहेत.बुलडाणा जिल्ह्यात एकूण 565 सहकारी दूध संस्थांची नोंद जिल्हा निबंधक दुग्ध विकास कार्यालयात आहे. 30 ते 35 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या यापैकी ब-याच संस्था सुरळीत चालू असताना शासकीय व राजकीय अनास्थेमुळे सध्या डबघाईस आल्या आहेत. त्यामुळेच यापैकी केवळ 21 संस्था सद्यस्थितीत जिवंत आहे. तर 38 संस्था सद्यस्थिीत बंद आहे. शिवाय कायदेशीरबाबींचा पूर्तता न केल्यामुळे 507 दुग्धसंस्था अवसायनात काढल्या आहे.गत पाच वर्षीचा दुष्काळ आणि अल्प व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्ण खचला आहे. या संकटातून उभा राहून सध्या खरिपाची तयारी बळीराजा करीत असताना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जात आहे. मात्र शेतक-यांना आर्थिक बळ देणा-या या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय संस्थांच्या कारभारात कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील दूध जाते बाहेरजिल्ह्यात सुरू असलेल्या 21 सहकारी दूध संस्थांमध्ये सरासरी 6361 प्रति. दिन लिटर दूध गोळा गेले जाते. यातही देऊळगावराजा येथील दूध संकलन केंद्रात गोळा होणारे दूध जालना जिल्हा आणि चिखली संकलन केंद्रातील दूध अकोला जिल्ह्यात पाठविले जाते. शिवाय नांदूर, मलकापूर, शेगाव या रेल्वे मार्गावर असलेल्या तालुक्यातील दूध मोठ्या प्रमाणात पॉवट आणि पॅकेटसाठी जळगाव व नागपूरकडे पाठविले जात आहे. बरेच शेतकरी खासगी दूध संस्थेकडे वळले आहे, शिवाय जास्त भाव मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील दुध अकोल व जालना जिल्ह्यात जाते, पाच वर्षाच्या दुष्काळ परिस्थिती झळा सोसल्यानंतर ब-याच शेतक-यांची आपल्याकडील जनावरांची विक्री केली. परिणामी जिल्ह्यातील दुधसंस्था बंद पडल्या.- एम. पी. मुळेजिल्हा दुग्ध व्यवसाय उद्योग अधिकारी, बुलडाणा