शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘कडकनाथ’ पालनात पाचशे कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 05:05 IST

इस्लामपूर (जि.सांगली) : शेतीपूरक व्यवसायाशी निगडित कडकनाथ कोंबडी पालनातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील ८ हजारावर सभासद शेतकऱ्यांची फसवणूक ...

इस्लामपूर (जि.सांगली) : शेतीपूरक व्यवसायाशी निगडित कडकनाथ कोंबडी पालनातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील ८ हजारावर सभासद शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आता धूम ठोकली आहे. कडकनाथ कोंबडी पालनाशी संबंधित कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती असून सुमारे आठ हजार गुंतवणूकदारांची ५०० कोटींपेक्षा अधिक रक्कम अडकली आहे.

गुंतवणूकदारांचा तगादा मागे लागल्याने या कंपनीच्या संचालकांनी पुणे येथे मुक्काम ठोकला आहे. आता अटकपूर्व जामीन घेण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कंपनीने १00 रुपयांच्या मुद्रांकावर अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता. आमची कंपनी प्रामुख्याने रेशीम, मत्स्य, कुक्कुटपालन व शेळी पालनाचा व्यवसाय करत आहे. लोकांना प्रशिक्षण देणे, व्यवसाय उभा करुन देणे तसेच व्यवसायातून उत्पादित होणारा माल खरेदी करणे याबरोबरच शेतकºयांना विश्वास देऊन खरेदीची कंपनी हमी देते. आमची कंपनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करत नाही, असे सांगत कंपनीने शेतकºयांची फसवणूक केली आहे. या मुद्रांकावर बोगस स्वाक्षºया आहेत, त्यावर नावाचा उल्लेख नाही. ‘लोकमत’ने या बोगस कंपनीचा पर्दाफाश केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

फसवणूक झालेल्या शेतकºयांनी पोलिसांत तक्रार करावी, म्हणजे आम्हाला रितसर कारवाईसाठी प्रयत्न करता येतील. न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकºयांच्या पाठीशी आहे.- राजू शेट्टी, माजी खासदारआरोग्यदृष्ट्या फायदेशीरचा दावाकडकनाथ कोंबडीची जात मध्य प्रदेशातील झांबुआ या आदिवासी पट्ट्यातील आहे. वैद्यकीयदृष्ट्या या कोंबडीची प्रजाती मानवी शरीरास उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. कंपन्यांनी त्याची जाहिरातबाजीही केली होती. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी याबाबत कोणताही अधिकृत दावा केलेला नाही. सांगली, इस्लामपूर येथील काही डॉक्टरांना विचारले असता त्यांनी, कडकनाथ कोंबडीच्या आरोग्यविषयक दाव्याबाबत काही सांगू शकत नसल्याचे स्पष्ट केले.