शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पाच शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: November 29, 2014 00:38 IST

अमरावतीसह वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांनी संपविली जीवनयात्रा.

अकोला: दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. नापिकीला कंटाळून विदर्भात गुरुवारी व शुक्रवारी पाच शेतकर्‍यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेडा येथे एका युवा शेतकर्‍याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू विष्णू राठोड हे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. या जिल्ह्यात आत्महत्येची दुसरी घटना मंगरूळपीर तालुक्यातील तर्‍हाळा येथे घडली. या घटनेत एका कर्जबाजारी शेतकर्‍याच्या एकुलत्या एक मुलाने विहीरीत उडी घेऊन मृत्यूला कवटाळले. राहूल आगळे हे त्याचे नाव असून, त्याचा १७ डिसेंबर रोजी विवाह निश्‍चित करण्यात आला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील रामकृष्ण शत्रुघ्न गावंडे या ३६ वर्षीय शेतकर्‍यानेही विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी, कर्ज आणि मुलांच्या आजारपणाला तो कंटाळला होता.भद्रावती तालुक्यातील विजासन येथील शेतकर्‍याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. सुरेश लटारी घुगुल (४२) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. यावर्षी झालेली नापिकी आणि कर्जाचा डोंगर सतत वाढत असल्याने त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथील विनोद गोविंद माळीक (३५) या शेतकर्‍याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे चार एकर शेती असुन त्यांच्यावर ८0 हजार रुपयांचे बँकेचे कर्ज आणि ५0 हजार रुपये खासगी कर्ज होते.