पुणे : वाढत्या तापमानामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा धोका कमी होत असला तरीही शनिवारी या रोगाने पाच रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ३४७ वर गेली आहे. तसेच शनिवारी स्वाइन फ्लूचे ७५ नवे रुग्ण आढळून आले.आतापर्यंत राज्यात ३ लाख ८४ हजार ५४९ फ्लूसदृश रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४० हजार ६०८ संशयित रुग्णांना आॅसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले आहे. मुंबईत ४० नवे रुग्ण मुंबई : मुंबईतील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या १ हजार ४३६ इतकी झाली आहे. रविवारी २२ मार्चला स्वाइनचे अजून ४० रुग्ण मुंबईत आढळले, तर मुंबईबाहेरून ४ नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. फेब्रुवारीत सुरू झालेली स्वाइनची साथ मार्च महिन्यातही कायम असून स्वाइनच्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही.
राज्यात स्वाइन फ्लूमुळे पाच मृत्यू
By admin | Updated: March 23, 2015 01:13 IST