शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरमध्ये रेल्वेच्या धडकेत पाच ठार

By admin | Updated: February 13, 2016 01:53 IST

सोलापूर- होटगी मार्गावर रेल्वेच्या धडकेत पाच अनोळखी इसमांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली़ ठार झालेले पाचही जण कर्नाटक

सोलापूर : सोलापूर- होटगी मार्गावर रेल्वेच्या धडकेत पाच अनोळखी इसमांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली़ ठार झालेले पाचही जण कर्नाटक राज्यातील असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग व विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व मृतदेह शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.शहरातील आसरा पुलाच्या परिसरातील सावतामाळी मंदिराच्या पाठीमागे रूळाजवळ पाच जण मृत झाल्याची खबर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रेल्वेतील कर्मचाऱ्याने सोलापूर रेल्वे नियंत्रण कक्षाला कळविली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना पाचही मृतदेह अस्ताव्यस्त पडलेले दिसले. एका मृताच्या खिशात डॉक्टरकडे घेतलेल्या उपचाराची चिठ्ठी सापडली. चिठ्ठीवरुन त्याचे नाव परशुराम कलोळे (रा. कलोळे, ता. जमखंडी, जि. बागलकोट, कर्नाटक) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले़ अन्य ४ जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. सर्व मृतदेहांचे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. (प्रतिनिधी)कर्नाटक पोलिसांशी संपर्कसोलापूर पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला असून त्यामुळे मृतदेहांची लवकर ओळख पटविता येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजीव भोसले यांनी सांगितले.डॉक्टरांची चिठ्ठी : एका मृत इसमाच्या खिशात पुण्यातील भुगाव परिसरातील डॉ. इनामदार यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याची चिठ्ठी सापडली़ डॉ़ इनामदार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी दररोज शेकडो रुग्ण माझ्याकडे येतात, मी निश्चितपणे काही सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.