शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सापांच्या विष तस्करीतील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: December 28, 2016 21:42 IST

सापांच्या विषाची तस्करीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता यात आणखी दोघांची नावे समोर आली

ऑनलाइन लोकमतचाकण, दि. 28 - सापांच्या विषाची तस्करीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता यात आणखी दोघांची नावे समोर आली आहेत. तर अटक आरोपी रणजित खारगे यावर विषाच्या तस्करीप्रकरणी मिरज आणि मुंबईमध्ये यापूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.चाकण मधील घरावर छापा टाकत ७१ विषारी साप आणि तीन बॉटल विष पोलीस आणि वन विभागाने ताब्यात घेत, या टोळीचे बिंग फोडले होते. तेव्हा यामध्ये मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता यामध्ये दोघांची नावे समोर आली. सांगलीतील डॉ. कदम नामक इसम कडेगाव इथून विष घेऊन जात असे, तर दुसरी व्यक्ती पुण्यातून येऊन विष विकत घेत असे. मात्र या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. यामध्ये लवकरच मोठ्या धेंड्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशमधील एक मोठी कंपनी विष खरेदी करत असल्याचे तपासात समोर आले. आत्ता पर्यंत ७५ लाख रुपयांपर्यंत विषाची विक्री केल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. परंतु यापेक्षा अधिक विक्री झाल्याचा अंदाज चाकण पोलिसांना आहे. अटकेत असलेले रणजित खारगे आणि धनाजी बेडकुटे सापांच्या विषाची तस्करी तीन वर्षांपासून करत आहे. चाकणमध्ये मात्र त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून ठाण मांडला होता. या तपासात कंपन्यासह बड्या डॉक्टरांची नावे या तस्करीत पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप अधिक तपास करीत असून उद्यापर्यंत अधिक माहिती हातात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.