शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत सलग पाच दिवस भारनियमनाचा जाच

By admin | Updated: June 30, 2016 06:05 IST

टॉवर मंगळवारी रात्री कोसळल्याने मंगळवार व बुधवारी दिवसभर विक्रोळी, वर्सोवा, अंधेरी, साकीनाका, बोरीवली, मालाड आणि कुर्ला या भागांत टप्प्याटप्प्याने भारनियमन करण्यात आले.

मुंबई : मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरच्या कळवा-सालसेट पारेषण यंत्रणेचा टॉवर मंगळवारी रात्री कोसळल्याने मंगळवार व बुधवारी दिवसभर विक्रोळी, वर्सोवा, अंधेरी, साकीनाका, बोरीवली, मालाड आणि कुर्ला या भागांत टप्प्याटप्प्याने भारनियमन करण्यात आले. दुरुस्तीचे काम होण्यासाठी किमान पाच दिवस लागणार असल्याने तोवर मुंबईकरांना रोज भारनियमनाचा जाच सहन करावा लागणार आहे. सदैव झगमगणाऱ्या मुंबईत प्रथमच सुमारे आठवडाभर भारनियमन होणार आहे.मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, रिलायन्स, टाटा पॉवर व महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. कळवा-सालसेट येथील पारेषण वाहिनीवरून वीज मुंबईत येते. त्यानंतर वीजवितरण कंपन्यांमार्फत शहर व उपनगराला वीजपुरवठा होतो.मुंबईत मंगळवारी रात्री कळवा-सालसेट दरम्यानच्या पारेषण वाहिनीचा टॉवर कोसळला. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून बोरीवली, मालाड, गोरगाव, कांदिवली आणि अंधेरी येथे भारनियमन सुरू झाले. त्यानंतर मुंबईत पुढील पाच दिवस भारनियमन होईल, असे उपनगरात वीज पुरवणाऱ्या रिलायन्स व टाटा पॉवरतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)>या भागांत भारनियमनपश्चिम उपनगरातील बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, साकीनाका तसेच कुर्ला या भागांत पुढील पाच दिवस भारनियमन होणार आहे.टाटा पॉवर काय म्हणते?कळवा-सालसेट वीज वाहिनी क्रमांक ३ व ४ चा टॉवर मंगळवारी रात्री कोसळला. या टॉवरजवळ कचरा टाकला जातो. त्यातून निर्माण होणाऱ्या मिथिन गॅसने टॉवर गंजला आणि कचरा टाकायला येणाऱ्या लोकांनी टॉवरचा संरचनात्मक भाग काढून टाकल्याने टॉवर पडल्याची शक्यता आहे. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.