शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

पाच धरणे पडली कोरडी

By admin | Updated: May 30, 2016 02:22 IST

मान्सून लांबल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाला उशिरा सुरुवात होणार आहे.

अलिबाग : मान्सून लांबल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाला उशिरा सुरुवात होणार आहे. लांबलेला पाऊस आणि कडक उन्हामुळे जिल्ह्यातील २८ धरणांपैकी रानीवली, वरंध, खिंडवाडी, कोर्थुडे आणि खेरे ही पाच धरणे कोरडी पडली आहेत. एकत्रित धरणांमध्ये फक्त १८.५६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा तीव्र बसण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाने दिली.रायगड जिल्ह्यात उष्णता वाढल्याने ३८ अंशापर्यंत तापमान नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्यातील अस्तित्वात असणाऱ्या २८ लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा प्रचंड उष्णतेमुळे आटत चालले आहे. त्यामुळे त्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या योजनांवर विपरीत परिणाम होत आहे. सदरील धरणांमध्ये फक्त १८.५६१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये लघुपाटबंधारे विभागांतर्गत २८ धरणांचा समावेश येतो. या सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता ही ७१.५७५ दशलक्ष घनमीटर आहे. ६८.२८६ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा वापरण्याजोगा आहे. परंतु आता धरणांनी तळ गाठायला सुरुवात केल्याने पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. पाऊस वेळेवर पडल्यास पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ शकते, परंतु वातावरणातील वाढते तापमान आणि लांबलेल्या मान्सूनमुळे सध्या तरी तशी शक्यता दिसून येत नाही. अशीच परिस्थिती अजून काही दिवस राहिल्यास नागरिकांचे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे. प्रशासनाचा सात कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई आराखडाही कुचकामी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याची समस्या जाणवणार असल्यानेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात दिल्या होत्या. (प्रतिनिधी)>धरणातील शिल्लक पाणीसाठारानीवली धरणाची साठवण क्षमता ही २.२२४ दलघमी आहे. सध्या तेथे ० टक्के पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे वरंध धरणाची साठवण क्षमता २.०८४ दलघमी सध्या ० टक्के, खिंडवाडी २.१३६ / ० टक्के, कोर्थुडे २.४९३ / ०, खेरे १.६५८ /० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर उर्वरित २३ धरणांत१८.५६१ पाणीसाठा आहे. पाऊस लवकर आला नाही, तर तोही आटण्याची शक्यता आहे.