शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांच्या हल्ल्यात पाच गंभीर जखमी

By admin | Updated: September 10, 2016 04:44 IST

गौरींच्या पूजनानंतर घरात झोपलेल्या महिलांसह पाच जणांना दरोडेखोरांनी लोखंडी गज, सत्तूर, दगडाने जबर मारहाण करून लाखाचा मुद्देमाल लंपास केला़

वाशी (जि. उस्मानाबाद) : गौरींच्या पूजनानंतर घरात झोपलेल्या महिलांसह पाच जणांना दरोडेखोरांनी लोखंडी गज, सत्तूर, दगडाने जबर मारहाण करून लाखाचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वाशी तालुक्यातील इंदापूर येथे घडली़ या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या चौघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हनुमंत मणिक गपाट, उमा गपाट, संदिपान गपाट, मंजुबाई गपाट व शिवाजी गपाट (सर्व रा. इंदापूर ता. वाशी) अशी जखमींची नावे आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चार दरोडेखोर घरात घुसले़ विरोध करणाऱ्यांना त्यांनी लोखंडी गजाने जबर मारहाण केली. यात हनुमंत यांच्या पत्नी उमा गंभीर जखमी झाल्या़ दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. रडण्याचा आवाज आल्याने आजूबाजूचे लोक येत असल्याचे दिसताच दरोडेखोर बाजूच्या शेतात पळून गेले. थोड्या वेळाने हनुमंत यांच्या घरापासून जवळच असलेल्या संदीपान गपाट यांच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश केला़ यावेळी संदीपान यांच्या पत्नी मंजुबाई यांना जबर मारहाण केली़, तर विनायक गपाट यांच्यावर दगडफेक केल्यामुळे तेही गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही घरांतील अनुक्रमे रोख ४४ हजार रूपये व ४६ हजार रुपयांचे दागिने असा एकूण ९० हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचे नमूद करण्यात आले आहे़ पोलीस सकाळी साडेआठच्या सुमारास घटनास्थळी आले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनीही घटनास्थळाची पाहणी केली़ (वार्ताहर)ग्रामस्थांवर दगडफेकआरडाओरड्यामुळे जागे झालेले काही युवक, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दरोडेखोरांनी दगडफेक केल्याने काहीजण किरकोळ जखमी झाले़ इंदापूर ते गोलेगाव रस्त्यावरील विनायक गपाट यांच्या गोठ्यात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला़ मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही़