शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

पुलगाव पालिकेच्या नगराध्यक्षासह पाच नगरसेवक अपात्र

By admin | Updated: June 23, 2016 21:10 IST

विरोधी पक्षाशी हातमिळणवणी केल्याप्रकरणी येथील नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी एका आदेशाद्वारे अपात्र घोषित

ऑनलाइन लोकमत

पुलगाव(वर्धा), दि. 23 - पक्षाशी बंडखोरी करून सत्तेकरिता विरोधी पक्षाशी हातमिळणवणी केल्याप्रकरणी येथील नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी एका आदेशाद्वारे अपात्र घोषित केले. या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.अपात्र सदस्यांमध्ये नगराध्यक्ष मनीष साहू यांच्यासह काँग्रेसचे राजीव बतरा, सुनील ब्राम्हणकर, स्मीता चव्हाण व सेनेच्या जयश्री बरडे यांचा समावेश आहे. हिंगणघाट नगर पालिकेच्या नगराध्यक्षासह सहा नगरसेवकांना अशाच कारणाने अपात्र व्हावे लागले होते. यानंतरची जिल्ह्यातील ही दुसरी मोठी अपात्रतेची कार्यवाही आहे.सन २०११ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे १०, अपक्ष ३ व सेना १ अशा १४ सदस्यांच्या गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करण्यात आली होती. परंतु, नगराध्यक्षांवर अविश्वासाचे सावट दिसताच नगराध्यक्ष मनीष साहू यांच्यासह काँग्रेसचे राजीव बतरा, सुनील ब्राम्हणकर, स्मीता चव्हाण हे काँग्रेसचे चार व सेनेच्या जयश्री बरडे हे नगरसेवक नोंदणीकृत काँग्रेस व सहकारी पक्षाच्या अधिकृत गटातून बाहेर पडले. नंतर त्यांनी भाजपाच्या पाच नगरसेवकांशी हात मिळवणी करून सत्ता काबीज केली.यावर काँग्रेसचे गटनेता राजन चौघरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करून पक्ष व गटाशी बंडखोरी केल्याप्रकरणी त्या पाचही नगरसेवकांवर कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली होती. या याचिकेवर तत्कालिन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी महाराष्ट्र लोकल एॅथोरिटी मेंबर्स डिसक्वॉलिफीकेशन अ‍ॅक्ट १९८६ च्या कलम ७ यु.एस. १६ (आय.ए.) अन्वये दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतली. प्रकरण निर्णयाप्रत पोहचताच जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांची चंद्रपूरला बदली झाली. अशातच पुलगाव दारूगोळा भांडारात अग्निस्फोट झाला. यामुळे निर्णय व्हायचा होता. परिणामी पाचही नगरसेवकांवर महिनाभरापासून अपात्रतेची टांगती तलवार होती.अखेर गुरुवारी या प्रकरणी जिल्हाधिकारी नवाल यांनी महत्त्वपूर्ण निर्णय देत नगराध्यक्ष मनीष साहू यांच्यासह या पाचही नगरसेवकांना अपात्र घोषित केले. नगर परिषद निवडणूक तोंडावर असताना काँग्रेस नगराध्यक्ष व नगरसेवकांना काँग्रेसकडून घरचा अहेर मिळाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.