मुंबई/कोल्हापूर : केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या १० हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत राज्यातील पाच शहरांचा समावेश आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, मुरगूड, पन्हाळा तर वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) आणि पाचगणी (जि. सातारा) या शहरांचा समावेश आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.हागणदारीमुक्त झालेल्या देशातील पहिल्या १0 शहरांची यादी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने बुधवारी जाहीर केली. यात तेलंगणामधील सिद्दीपेठ, सदनगा, सूर्यापेठ, अचमपेठ आणि हुजूनगर या शहरांचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)
राज्यातील पाच शहरे हागणदारीमुक्त
By admin | Updated: September 1, 2016 06:04 IST