शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिशुगृहातून पाच बालकेगायब

By admin | Updated: January 21, 2015 01:38 IST

शहरातील हालगेगल्लीतील महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्व. सेठ नेमीचंद दीपचंद बडेरा शिशुगृहातील पाच बालक गायब असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उघडकीस आली.

परळी : शहरातील हालगेगल्लीतील महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्व. सेठ नेमीचंद दीपचंद बडेरा शिशुगृहातील पाच बालक गायब असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उघडकीस आली. परळी पोलिसात यासंदर्भात तक्रार देण्यात येणार असल्याचे बालकल्याण समितीचे दत्ता नलावडे यांनी सांगितले.असाह्ण, बेघर बालकांचे संगोपन करणारी व अनाथाचा नाथ म्हणून या शिशुगृहाची ख्याती आहे. येथे ० ते ६ वयोगटातील निराधार बालकांचे संगोपन करण्यात येते. नियमित तपासणीसाठी बालकल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकाऱ्यांनी शनिवारी भेट दिली़ तेव्हा ही माहिती उघडकीस आली. शिशुगृहाच्या रेकॉर्डवर ११ बालक असल्याची नोंद होती. प्रत्यक्षात ६ बालक असल्याचेच समितीच्या लक्षात आले. इतर पाच बालके कोठे आहेत, याबाबत विचारणा केली असता शिशुगृहातील कर्मचाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांनी हा प्रकार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिला.तात्पुरत्या स्वरुपात दत्तक दिली शिशुगृहातील पाच बालक तात्पुरत्या स्वरुपात राजस्थान, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातील मोठ्या व्यक्तींकडे दत्तक दिली, तर एका बालकावर हैद्राबाद येथे उपचार सुरू असल्याचे महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनचे सचिव (जालना) चे वीरेंद्रप्रसाद धोका यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)च्महाराष्ट्रात आमच्या संस्थेच्या वतीने जालना, जळगाव आणि परळी येथे शिशुगृह चालविण्यात येतात. यात कोणताही चुकीचा प्रकार घडलेला नाही. आमच्याकडे बालक दत्तक घेण्यासाठी ४५० जणांची प्रतीक्षा यादी आहे. ही बालके गायब झालेली नाहीत तर ती संस्थेने तात्पुरत्या स्वरूपात दत्तक दिली आहेत. ही सर्व बालके सुरक्षित असल्याचे मारवाडी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव वीरेंद्र धोका यांनी सांगितले.दत्तक परवानाच नाही मुले दत्तक द्यायचेच असेल तर कुटुंबाची सर्व माहिती घेऊनच संस्थेला परवानगी देण्यात येते. बालगृहातील मुले अशी दत्तक देताना त्यासाठी शासनाचा परवाना त्या संस्थेकडे आवश्यक असतो. सध्या असा परवानाच नाही. २०१३ साली परवान्याची मुदत संपल्यानंतर त्यांनी पुन्हा असा परवाना घेतलेला नसल्याचे बालकल्याण समितीचे अध्यक्ष दत्ता नलावडे यांनी सांगितले.परळीतील बडेरा शिशुगृहात २००९ ते २०१५ या कालावधीत ७३ असाह्ण, बेघर बालकांचे संगोपन करण्यात आले. ७३ पैकी ४५ बालक कायदेशीररीत्या दत्तक देण्यात आले आहेत. ४ बालके इतर संस्थांकडे स्थलांतरीत करण्यात आले, तर सहा बालकांचा मृत्यू झाला आहे.११ बालकांपैकी एका बालकाला उपचारासाठी हैदराबादला दाखल केले आहे, तर चौघांना दत्तक दिली आहेत. यात कोणताही गैरप्रकार नसून मुलांना दत्तक देण्यासाठी बालकल्याण समितीकडे प्रस्ताव दिलेला होता असे शिशुगृहाचे काळजीवाहक गजानन शिंदे यांनी दिली.