शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

पाच आरोपींना सश्रम कारावास

By admin | Updated: May 7, 2015 03:16 IST

हत्या प्रकरणातून सत्र न्यायालयात निर्दोष सुटलेल्या पाच आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या कलमांतर्गत दोषी ठरवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

नागपूर : हत्या प्रकरणातून सत्र न्यायालयात निर्दोष सुटलेल्या पाच आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या कलमांतर्गत दोषी ठरवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.योगेश भोयर (३०), सपना बावरिया (३७), विजय ऊर्फ सलोनी चापरे (२४), अमन ऊर्फ सोनू मेंढे (२३) व अजय सुनील बावणे (२४), अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत़ उच्च न्यायालयाने भादंविच्या कलम ३०४-२ अंतर्गत योगेशला पाच वर्षे , इतर आरोपींना प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्या़ अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली़ मृताचे नाव राकेशकुमार होते. या घटनेचे चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. सत्र न्यायालयाने ओळख परेडवर संशय व्यक्त करून आरोपींना निर्दोष सोडले होते. या निर्णयाविरुद्ध शासनाने उच्च न्यायालयात अपील केले होते. २६ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त सरकारी वकील तहसीन मिर्झा यांनी प्रकरणातील महत्त्वपूर्ण बाबी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत सत्र न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला होता. यानंतर न्यायालयाने शासनाचे अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल करून आरोपींविरुद्ध अटक वॉरंट बजावला होता. (प्रतिनिधी)अशी घडली घटनातृतीयपंथीयांच्या वेशात रेल्वे प्रवाशांकडून बळजबरीने पैसे उकळणे हा आरोपींचा व्यवसाय आहे. २८ जून २०११ रोजी संघमित्रा एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकारवर थांबल्यानंतर आरोपी तृतीयपंथीयांच्या वेशात प्रवाशांना पैसे मागायला लागले. या गाडीत राकेशकुमार व त्याचे मित्र बसले होते. दरम्यान, राकेशकुमार व आरोपींमध्ये भांडण झाले. आरोपी योगेशने राकेशकुमारच्या मांडीत चाकू भोसकला तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे राकेशकुमारचा मृत्यू झाला होता.