शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील तरुणांसाठी फिटनेस मंत्रा

By admin | Updated: August 26, 2016 02:29 IST

पिळदार शरीरयष्ठीचे स्टार्स पाहिले की, तरुण शारीरिक फिटनेसबाबत अत्यंत जागरूक राहण्याचा प्रयत्न करतात

आविष्कार देसाई,

अलिबाग- पिळदार शरीरयष्ठीचे स्टार्स पाहिले की, तरुण शारीरिक फिटनेसबाबत अत्यंत जागरूक राहण्याचा प्रयत्न करतात, मात्र फिटनेस राखण्यासाठी त्यांना खासगी व्यायामशाळेचा (जीम) आधार घ्यावा लागतो. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना खासगी ट्रेनर अथवा महागड्या जीममध्ये जाता येत नाही. यावर उपाय म्हणून जिल्ह्यात जीम उभारण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९१ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.विविध स्टार्सच्या चांगल्या वाईटाचा प्रभाव तरुणाईवर पडत असतो. त्या स्टार्ससारखी आपलीही बॉडी व्हावी, यासाठी सध्या जीममध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे आपल्याला जीमच्या संख्येवरुन लगेचच लक्षात येईल. सार्वजनिक जीममध्ये मोठ्या संख्येने गर्दी असते. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ तरुणांना मिळत नाही, तर दुसरीकडे खासगी जीममधील फी परवडत नाही. त्यामुळे अशा फिटनेसप्रेमींचे हाल होतात. तरुण पिढी सुदृढ राहिली पाहिजे यासाठी व्यायामशाळा उभारण्यासाठी आणि साहित्य खरेदीसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते.२०१६-१७ अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९१ लाख रुपयांचे अनुदान व्यायामशाळा उभारण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव शीतल तेली-उगले यांनी १९ आॅगस्टच्या पत्राने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील विविध १३ शाळा आणि संस्थांना व्यायामशाळा बांधण्यासाठी प्रत्येकी सात लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आधुनिक जीम उभारले जाणार असल्याने फिटनेसप्रेमींना कमी खर्चामध्ये आपापला फिटनेस ठेवता येणार आहे. >जिल्हा नियोजन समितीने ९१ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत जागृती करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील विविध शाळांनीही अनुदानासाठी अर्ज करावेत. पुढच्या टप्प्यात त्यांनाही मंजुरी देण्यात येईल.- महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी