मुंबई : शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असणे अतिशय महत्त्वाचे आहे. फिटनेस असल्यास एखादी व्यक्ती सक्रिय आणि उत्पादनक्षम नागरिक बनू शकते आणि राष्ट्राच्या निर्माणामध्ये हातभार लावू शकते. देशपातळीवर योग दिनाची सुरुवात केली आहे. त्या धर्तीवर ‘फिटनेस दिवस’ सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शहरी भागातील जीवन वेगवान झाले आहे. बैठी जीवनशैली झाली आहे. त्यामुळे व्यायाम होत नाही. असे झाल्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. एका फिटनेस सेंटरचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.उद्घाटनप्रसंगी शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या सहा बॉडी बिल्डर्सचा सत्कार करण्यात आला. बिल्डर्सच्या परिश्रमांचे आणि त्यांनी केलेल्या साधनेचे या वेळी कौतुक केले. यांनी शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मर्यादा असूनसुद्धा त्यांच्या शरीरसौष्ठवाच्या आणि व्यायामाच्या छंदाला जोपासले. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यांनी केलेले कार्य हे प्रोत्साहन देणारे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. फिटनेसचे महत्त्व सर्वांना कळणे आवश्यक आहे. यासाठी फिटनेस दिवस साजरा केला पाहिजे. (प्रतिनिधी)
राज्यात आता फिटनेस दिवस
By admin | Updated: November 11, 2015 01:02 IST