शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमार नौकांवरील कारवाई अखेर मागे

By admin | Updated: May 16, 2016 02:52 IST

हाराष्ट्र मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांच्या प्रयत्नांनंतर ही कारवाई मागे घेण्यात आली

मुंबई: महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ कलम १३ अंतर्गत २३ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने नेव्ही, कोस्टगार्ड व सागरी पोलिसांनी मच्छीमार नौकाची तपासणी करून राज्याच्या मत्स्यव्यवसाय खात्यास अहवाल सादर केला होता. त्यानंतर, १०८ मासेमारी नौकांवर कारवाई करण्यात आली होती. तथापि, महाराष्ट्र मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांच्या प्रयत्नांनंतर ही कारवाई मागे घेण्यात आली आहे. सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त युवराज चौगुले यांनी किमान १०८ मासेमारी नौकांवरील खलाशांचे बायोमेट्रिक कार्ड, स्मार्ट कार्ड / मच्छीमार सहकारी संस्थेने दिलेले ओळखपत्र, जीवरक्षक साधने, नौकेचा विमा उपलब्ध न झाल्याने मासेमारी परवाना, नौका नोंदणी प्रमाणपत्र, कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करून, निलंबनाची कडक कारवाई केली होती. त्यामुळे आधीच मासळीचा दुष्काळ असल्याने, तसेच हंगाम संपत आल्याने नौका मालक आणि खलाशांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रथमच अशा प्रकारे मच्छीमार नौकांची नोंदणी बंद केल्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र असंतोष पसरल्याचे संधे यांनी आयुक्तांसमोर आणले. नेव्ही व कोस्टगार्ड यांनी नौकेवरील मच्छीमारांचा छळ करणे, मारहाण करणे, खटले भरणे, डिझेल बंद करणे हे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे या कारवाई झालेल्या १०८ मासेमारी नौकांना न्याय मिळण्यासाठी रामदास संधे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विभागातील मच्छीमार सहकारी संस्थाच्या प्रतिनिधींनी मत्स्यव्यवसाय आयुक्त मधुकर गायकवाड यांची भेट घेऊन, या मच्छीमार नौकांवरील करवाई मागे घेण्याची विनंती केली.मधुकर गायकवाड यांनी याबाबत सविस्तर चर्चा करून निलंबनाची कारवाई तत्काळ मागे घेण्यात असून, लवकरच आदेश जारी करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. या वेळी मत्स्यव्यवसाय उपसचिव श्रीमती सूर्यवंशी, मत्स्यव्यवसाय अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जाधव व विनोद नाईक, सहायक आयुक्त युवराज चौगुले, तसेच महाराष्ट्र मच्छीमार संघाचे संचालक सिराज अब्दुल अजीज डोसानी, किशोर गावाणी, संस्थेचे प्रतिनिधी दिलीप पागधरे, श्याम भिका, वसंत माहुलकर, अशोक कुटेवाला, अशोक नाईक, पालव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)