शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

मच्छीमार करणार समुद्रात आंदोलन

By admin | Updated: January 14, 2015 04:47 IST

मासेमारीच्या मोसमात ओएनजीसीद्वारे (आॅइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन) होणा-या तेल सर्वेक्षणामुळे मच्छिमारांना समुद्रात येण्यास मज्जाव करण्यात येत आहे

राजू काळे, भार्इंदरमासेमारीच्या मोसमात ओएनजीसीद्वारे (आॅइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन) होणा-या तेल सर्वेक्षणामुळे मच्छिमारांना समुद्रात येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे सरकार व कंपनीच्या निषेधार्थ कुलाबा ते सातपाटीचे (पालघर) मच्छीमार येत्या शुक्रवारी भरसमुद्रात सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने करणार आहेत. पश्चिम किनारपट्टीवरील वसई ते अर्नाळा समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ५० नॉटीकल मैल अंतरावर ओएनजीसी तेल कंपनीमार्फत १५ जानेवारीपासून तेलसर्वेक्षण सुरू होणार आहे. ते महिनाभर चालण्याची शक्यता आहे. ते साधारणत: ८ ते १० चौरस नॉटीकल मैल क्षेत्रातच होण्याची शक्यता असली तरी सर्व्हेक्षणादरम्यान मच्छीमारांना समुद्रात ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ऐन मासेमारी मोसमात मच्छीमारांच्या व्यवसायावर यामुळे संक्रांत येणार आहे. तेल सर्वेक्षण १५ मे नंतर मासेमारी बंदीच्या कालावधीत करण्याची मागणी मच्छिमारांनी केली आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने येत्या दोन दिवसांतही त्यावर निर्णय न झाल्यास १६ जानेवारीला कुलाबा ते सातपाटी किनारपट्टीवरील सर्व मच्छीमार सुमारे ३० ते ३५ नॉटीकल मैल खोल समुद्रात मोर्चा काढणार आहेत. तसेच बोटीवर काळे झेंडे लावून ओएनजीसी व शासनाच्या या धोरणांचा निषेध करणार आहेत. यावेळी समुद्रातील १९-२५ व ७२-१२ (जीपीएस पोझिशन सिस्टीम) या ठिकाणी मच्छीमार बोटी एकत्र जमतील, असे निर्देश संबंधित मच्छीमार संस्थांनी सदस्यांना दिले आहेत.