शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारक जागेवरून मच्छीमार आक्रमक

By admin | Updated: November 5, 2016 03:57 IST

शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याच्या जागेहून अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने शुक्रवारी विरोधप्रदर्शन केले आहे.

 मुंबई : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याच्या जागेहून अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने शुक्रवारी विरोधप्रदर्शन केले आहे. हरित लवादात याचिका दाखल केल्यानंतरही सरकार टेंडर काढत असल्याची नाराजी कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी व्यक्त केली. तांडेल म्हणाले की, प्रकल्पासाठी लागणाऱ्या हजारो कोटी रुपयांमध्ये टक्केवारी हवी असल्याने भारतीय जनता पार्टी आणि आमदार विनायक मेटे प्रकल्प राबवण्याची घाई करत आहेत. मुळात हरित लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेतील सुनावणीवर स्मारकासाठी निवडलेल्या जागेवर मासेमारी होत नसल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. याउलट संबंधित ठिकाणी १५० प्रकारच्या समुद्री जीवांचे वास्तव्य आहे. केवळ ४० प्रजातीचे खेकडे या परिसरात आढळतात. याशिवाय डॉल्फीन, लॉब्स्टर आणि अन्य माश्यांच्या प्रजाती याठिकाणी मिळतात. तरीही सरकारने लवादासमोर दिलेले स्पष्टीकरण हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपने शिवस्मारकाची जागा बदलली नाही, तर येत्या सर्व निवडणुकांत भाजपला मतदान न करण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतल्याचेही तांडेल यांनी सांगितले. शिवाय प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम पाच हजार मच्छीमार बोटींनी घेराव घालून कृती समिती उधळून लावेल, असा इशाराही तांडेल यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)>समुद्री जीवांचे वास्तव्यभाजपाने शिवस्मारकाची जागा बदलली नाही, तर येत्या सर्व निवडणुकांत भाजपाला मतदान न करण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतल्याचेही तांडेल यांनी सांगितले.संबंधित ठिकाणी १५० प्रकारच्या समुद्री जीवांचे वास्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.