शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात पावसाने घेतला पहिला बळी

By admin | Updated: June 29, 2016 02:48 IST

गेले पाच दिवस सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काहीशी उसंत घतेली आहे.

ठाणे : गेले पाच दिवस सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काहीशी उसंत घतेली आहे. मात्र शहरी भागात सरींवर सरी सुरू आहेत. तेथील पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. दोन दिवसांतील संततधारेमुळे मुंब्रा येथे भिंत कोसळून एकाचा बळी गेला. ठाण्याच्या इतर भागातही भिंत, झाडे कोसळण्याच्या ११ घटना घडल्या. रस्त्याच्या मध्यभागी झाडे कोसळल्यामुळे ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली होती. दरम्यान, सुरूवातीला संततधारेचा अनुभव देणाऱ्या पावसाने सोमवारी काहीकाळ उसंत घेतली असली तरी मंगळवारी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मधूमधून जोरदार सरी कोसळत होत्या. मुरबाड, शहापूरमध्ये अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसल्याने पाणीटंचाईतून पूर्णत: दिलासा मिळेला नाही. कल्याण-डोंबिवलीत ती टप्प्याटप्प्याने उठवली जात आहे. मात्र ठाण्यातील पाणी बंद आहे. काहीशा उशिराच आलेल्या पावसाने आपल्या गैरहजेरीची कसर भरून काढण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने मंगळवारीही काही काळ संततधार कायम ठेवली. या पावसामुळे शहराच्या अनेक भागात पडझडीच्या घटना घडल्या. मुंब्रा रेतीबंदर येथील विष्णू नामदेव पाटील चाळीची भिंत कोसळून इसमाली ज्योतिबा कांबळे (७५) यांचा जागीच मृत्यू झाला. कोपरीतील गुरु नानक सोसायटीत रार्वती प्रितमानी यांच्या घराचे छत कोसळले. सुदैवाने त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ठाकूरपाडा- मुंब्रा येथील यादव भागवत या चाळीच्या जिन्याचा भाग कोसळल्यामुळे ही चाळवजा इमारत धोकादायक झाली आहे. >वागळे भागात, ज्ञानेश्वरनगर येथे नाल्याची भिंत पडल्याची घटना घडली. यातही कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. या पावसामुळे दोन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. एका ठिकाणी पाणी तुंबले होते. राबोडीतही पाणी तुंबण्याच्या तक्रारी होत्या. ठामपाच्या आपत्कालीन विभागाने आणि अग्निशमन दलाने या आपत्कालीन स्थितीचा योग्य सामना केल्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. >टंचाईतून दिलासाकल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या २४ तासात ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १० टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत तीन हजार ८६८ मिमी पाऊस बरसला होता. तर आता केवळ एक हजार ८०७ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण आणि निवारण कक्षातून देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसत होता. मात्र, सोमवार सकाळपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कर्जत, कसारा, टिटवाळा ते सीएसटी या मार्गावरील लोकल सेवा काहीशी विस्कळीत झाल्या होत्या. पावसाळ््यापूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांनी तळ गाठल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील काही भागात तर चार अथवा आठ दिवसातून एक वेळ पाणी मिळत होते. मात्र, पंधरा दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस अखेर बरसू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.