शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात यंदा प्रथमच ‘पेपरलेस’ पशुगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 15:21 IST

अकोट(जि. अकोला): दर पाच वर्षातून होणारी पशूगणना राज्यात यंदा प्रथमच पेपरलेस होत आहे. ही गणना ‘टॅबलेट पीसी’द्वारे करण्यात येत असून, यासाठी विशेष प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- विजय शिंदेअकोट(जि. अकोला): दर पाच वर्षातून होणारी पशूगणना राज्यात यंदा प्रथमच पेपरलेस होत आहे. ही गणना ‘टॅबलेट पीसी’द्वारे करण्यात येत असून, यासाठी विशेष प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पेपरलेस पशूगणना करण्याचा हा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.देशात दर पाच वर्षातून एकदा पाळीव प्राणी, मत्स्य उद्योग तथा दुग्ध व्यवसाय विषयक औजार/मशिनरी साहित्याची गणना करण्यात येते. यंदा होणारी २० वी पशुगणना राज्यात प्रथमच टॅबलेट पिसीवर करण्यात येत आहे. याकरीता प्रशासनाकडून विशेष प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून,या प्रगणकांना प्रशिक्षित करण्यात आलेआहे.गाय-बैल, म्हशी, कुक्कुट पक्षी, घोडे, खेचर, कुत्रे, डुकरे इत्यादी सोबतच भटके कुत्रे, गाई अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांची गणना यामध्ये करण्यात येत आहे. मांस विक्री दुकाने, मत्स्य व्यवसायात गुंतलेली कुटुंब, यांची सुद्धा सविस्तर माहिती संकलीत करून देशभरातील पशुसंवर्धन विषयक धोरण व योजना ठरविल्या जातात. त्यामुळे या पशुगणनेला विशेष महत्त्व आहे.अकोला जिल्ह्यात तालुकास्तरावर याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या असून प्रत्यक्ष पशुगणनेला सुद्धा सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व कुटुंबांकडून माहिती मिळवण्यासाठी पशुगणना प्रगणक लवकरच घरोघरी येतील तेव्हा त्यांना आवश्यक माहिती पुरविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अकोट येथे प्रशिक्षण कार्यशाळापशुसंवर्धन विभागाच्या वतीने अकोट येथे प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. ए. व्हि. कडू, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. बी. निचळ, प्रशिक्षक डॉ. नंदकिशोर चिपडे, डॉ. राजधन वानखडे, डॉ. अरूण पाटील, डॉ. वैभव पटेल, डॉ. राधेश्याम चव्हाण, डॉ. आर. पी. म्हात्रे, एस. एफ. मोरखडे, डॉ. एन. जे. घोंगे, डॉ. एन. एल. काळपांडे यांच्याह तालुक्यातील पशूगणना प्रगणक प्रामुख्याने उपस्थित होते. 

केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया' च्या धर्तीवर पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेत पशुगणने सारखे व्यापक कार्य पेपरलेस केले आहे. हा देशातील प्रथमच प्रयोग असून, डिजिटायझेनमुळे पशुगणना अधिक अचूकपणे व विहित कालावधीत पूर्ण होऊ शकेल. तसेच कागद व वेळेचीही बचत होण्यात मदत होणार आहे.- डॉ. नंदकिशोर चिपडे,पशुगणना प्रशिक्षक, जिल्हा परिषद, अकोला.

 

टॅग्स :akotअकोट