शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरीय रुग्णालयात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्ण घोषित

By admin | Updated: June 27, 2016 05:30 IST

अवयवदानाचा टक्का वाढत असताना महापालिका रुग्णालयेही सक्रिय होत आहेत.

मुंबई : अवयवदानाचा टक्का वाढत असताना महापालिका रुग्णालयेही सक्रिय होत आहेत. उपनगरीय रुग्णालयात पहिल्यांदाच राजावाडी रुग्णालयात १६ वर्षीय रुग्णाचा मेंदू मृतावस्थेत असल्याचे समजले. त्यानंतर, या रुग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या गोदरेज रुग्णालयात नेण्यात आले. या मुलाचे हृदय, मूत्रपिंड आणि यकृतदान केल्यामुळे चार जणांना जीवनदान मिळाले आहे. १६ वर्षीय मुलाचा अपघात झाल्यावर त्याला राजावाडी रुग्णालयात २१ जून रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मेंदू मृतावस्थेत गेल्याचे डॉक्टरांनी निदान केले. २४ जूनला या मुलाचा मेंदू मृतावस्थेत असल्याचे निदान झाल्यावर २५ जून रोजी त्याला गोदरेज रुग्णालयात हलवण्यात आले. २५ जूनला रात्री पावणेदोनच्या सुमारास या मुलाचे अवयवदान करण्यात आले. रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी या मुलाचे हृदय काढण्यात आले आणि अवघ्या २३ मिनिटांत २३ किमीचे अंतर कापून हृदय कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले. या रुग्णालयात पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. १६ वर्षीय मुलाचे हृदय ३१ वर्षीय महिलेला प्रत्यारोपित करण्यात आले आहे. हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण विभाग प्रमुख डॉ. नंदकिशोर कपाडिया यांनी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. रुग्णाची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. यकृत ग्लोबल रुग्णालयातील ७६ वर्षीय पुरुषास देण्यात आले आहे, तर एक मूत्रपिंड गोदरेज रुग्णालयात तर दुसरे मूत्रपिंड जसलोक रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>ग्रीन कॉरिडोर घाटकोपर येथील गोदरेज रुग्णालयातून रात्री १ वाजून ५४ मिनिटांनी हृदय घेऊन रुग्णवाहिका निघाली. २ वाजून १७ मिनिटांनी हृदय घेऊन रुग्णवाहिका अंधेरी कोकिलाबेन रुग्णालयात पोहोचली. गोदरेज रुग्णालय - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे - छेडा नगर - एस.एल.आर ब्रीज - सीएसटी रोड, कुर्ला - मुंबई विद्यापीठ - हयात हॉटेल - बिसलेरी कंपनी - अंधेरी रेल्वे ब्रीज - आयओसी जंक्शन - चार बंगला - कोकिलाबेन रुग्णालय