शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महापालिका निवडणुकीवर पहिल्यांदाच ‘ड्रोन’ची नजर

By admin | Updated: May 22, 2017 19:42 IST

सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानासाठी गत काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात इव्हिएम मशिनचा वापर केला जातो.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 22 - सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानासाठी गत काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात  इव्हिएम मशिनचा वापर केला जातो. तर मतदानाच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये शांततेत प्रक्रिया पार पडावी यासाठी पोलीस दल तैनात केले जाते. मात्र, पोलिसांना काम करताना अडचणी लक्षात घेऊन मालेगाव महापालिकेच्या मतदानाच्या दिवशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात चार ड्रोन कॅमे-यांचा वापर केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी राज्यात पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सोमवारी (दि़२२) पत्रकार परिषदेत दिली.
 
मालेगाव महापालिकेसाठी बुधवारी (दि़२४) मतदान होत असून ८४ जागांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहेत़ तर एक नगरसेवक निवडणुकीपुर्वीच बिनविरोध निवडून आला आहे. मालेगाव महापालिकेसाठी पूर्व व पश्चिम मालेगाव असे भाग असून पूर्व भागात मुस्लिम संख्या अधिक तर पश्चिम मालेगावमध्ये हिंदूची संख्या अधिक आहे. पूर्व भागातील काही मतदान केंद्रे ही संवेदनशील असून तेथील मतदान केंद्रांसाठी जागेचे आकारमान मतदारसंख्येच्या तुलनेने कमी आहे. पूर्व मालेगावातील काही शाळांच्या मतदान केंद्रावर २६ पर्यंत बुथची संख्या असल्याने अशा ठिकाणी एकाच वेळी गर्दी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
 
मालेगाव शहरातील संवेदनशील व गर्दीचे ठिकाणच्या मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात आले आहेत. याबरोबरच पोलिसांच्या मदतीसाठी चार ड्रोन कॅमे-यांचा वापर केला जाणार आहे़. प्रत्येक ड्रोन कॅमे-याने टिपलेली दृश्य ही पोलीस कर्मचा-यांना लॅपटॉपवर दिसणार असून गर्दीचा अंदाज येणार आहे़. या पोलिसांसमवेत स्थानिक रहिवासी असणार असून गर्दीच्या ठिकाणची माहिती तत्काळ पोलिस नियंत्रण कक्ष तसेच संबंधित ठिकाणी ड्यूटीवर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वायरलेस तसेच लाऊडस्पीकरवरून दिली जाणार आहे़. या ड्रोन कॅमेºयामुळे पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे़
राज्यात महापालिका निवडणुकांसाठी कायदा व सुव्यवस्था तसेच गर्दीवरील नियंत्रणासाठी ड्रोन कॅमेरे वापरले जाण्याची ही पहिलीच वेळ असून तिचा वापर मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी केला जाणार आहे़. विशेष म्हणजे ड्रोन कॅमेºयाद्वारे आकाशतून अगदी गल्लीबोळापर्यंतची सूक्ष्म माहिती पोलिसांना उपलब्ध होणार आहे़. त्यामुळे या ड्रोनचा वापर पोलिसांना कशा प्रकारे लाभदायक ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़