शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धगडावर पहिल्यांदा दीपोत्सव !

By admin | Updated: November 2, 2016 02:45 IST

सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी वीरगती प्राप्त झाली

नेरळ : सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी वीरगती प्राप्त झाली, ते हुतात्मे झाले. तेथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा ज्योत उभारण्यात आली असून पहिल्यांदाच येथे दिवाळीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. पाचशेहून अधिक पणत्या प्रज्वलित करून वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील तसेच क्र ांतिवीरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, या निमित्ताने पवित्र वीरभूमी सिद्धगड येथे प्रथमच दीपावलीनिमित्त दिवे रोषणाईचा उत्सव हा शहिदांचे स्मरण म्हणून कर्जत तालुक्यातील अवसरे येथील क्र ांतिवीर भगत मास्तर यांचे पुत्र भरत भगत आणि धनेश राणे यांच्या संकल्पनेतून या नवीन पर्वाला सुरवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने युवक, शिक्षकवृंद, समाजसेवक शहिदांचे स्मरण म्हणून एक दिवा तेवण्याकरिता उपस्थित होते. यावेळी क्र ांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत, कल्पेश डुकरे आदिंनी हुतात्म्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. क्रांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत, मानिवली ग्रामपंचायत सदस्य प्रशांत झांजे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)>नवीन पर्व सुरूवीर भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील तसेच क्रांतिवीरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, या निमित्ताने पवित्र वीरभूमी सिद्धगड येथे प्रथमच दीपावलीनिमित्त दिवे रोषणाईचा उत्सव हा शहिदांचे स्मरण म्हणून कर्जत तालुक्यातील अवसरे येथील क्रांतीवीर भगत मास्तर यांचे सुपुत्र भरत भगत अणि धनेश राणे यांच्या संकल्पनेतून या नवीन पर्वाला सरुवात करण्यात आली. रविवारी रात्री १२ वाजता पणत्या लावून संपूर्ण परिसर रोषणाईने उजळून निघाला होता. >सैनिकांसाठी दीपोत्सवकर्जत : कर्जतकरांच्यावतीने पाडव्याच्या संध्याकाळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांकरिता पणती लावून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांच्या हस्ते भारतमातेच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व पहिली पणती त्यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश लाड, मिलिंद चिखलकर, अशोक ओसवाल, नगरसेविका सुवर्णा जोशी आदी उपस्थित होते. प्रत्येकाने एक पणती पेटवून सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांकरिता दीपोत्सव साजरा केला. कार्यक्र माचे आयोजन भाजपाचे राहुल कुलकर्णी यांनी केले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.