शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डेंनी ' शोभा' केलेल्या 'त्या' पोलिसावर मुंबईत पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 08:50 IST

आपल्या वादग्रस्त ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका शोभा डे यांनी तब्येतीवरुन खिल्ली उडवलेल्या मध्य प्रदेशचे पोलीस दौलतराम जोगावत यांच्यावर गुरुवारी पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - आपल्या वादग्रस्त ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका शोभा डे यांनी तब्येतीवरुन खिल्ली उडवलेले पोलीस अधिकारी दौलतराम जोगावत यांच्यावर गुरुवारी पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील प्रसिद्ध सर्जन डॉ. लकडावाला यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शोभा डे यांनी ट्विटरच्या माध्यमातून खिल्ली उडवलेल्या मध्य प्रदेशच्या पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत यांच्यावर या आठवड्यात उपचारास सुरुवात झाली.
 
महापालिका निवडणूक मतदानावेळी शोभा डे यांनी दौलतराम यांचा फोटो ट्विटरवर शेअर करून ‘मुंबईत हेवी बंदोबस्त’ अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली होती.  शोभा डे यांनी उडवलेली खिल्ली मात्र जोगावत यांच्यासाठी फायद्याची ठरली असंच म्हणावं लागेल. वजन कमी करण्याचा निर्णय घेऊन दौलतराम उपचारांसाठी मुंबईत दाखल झाले. त्यांच्यावर चर्नी रोडवरील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी डॉ. लकडावाला आणि त्यांच्या टीमने दौलतराम यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया केली. दौलतराम यांचं सध्या वजन 180 किलो असून, त्यांच्यावर उपचार करुन वजन  80 ते 100 किलोच्या आसपास आणण्याचे डॉक्टरांचे लक्ष्य आहे. 
(शोभा डेंनी खिल्ली उडवलेल्या 'त्या' पोलीस कर्मचा-यावर उपचार सुरू)
दरम्यान, शोभा डे यांनी आपली खिल्ली उडवल्याबद्दल दौलतराम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. १९९३ पर्यंत माझी प्रकृती सर्वसाधारण होती, पण पित्ताशयाचा आजार बळावल्याने इन्सुलिनचे प्रमाण वाढले आणि वजन वाढत गेले, असे दौलतराम यांनी म्हटले आहे.
 
उपचारांचा खर्च द्या
शोभा डे यांच्या खोचक प्रश्नाला उत्तर देताना जोगावत यांनी, ‘अति खाण्यामुळे माझे वजन वाढलेले नाहीये,’ असे म्हणत, ‘बारीक होणे कुणाला आवडत नाही?’ असेही म्हटले होते. शिवाय, ‘मॅडमने माझ्या उपचारांचा खर्च द्यावा,’ असा टोलाही जोगावत यांनी डे यांना लगावला होता.