शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य

By admin | Updated: June 10, 2014 23:30 IST

राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आल्यानंतर आता बुधवारपासून शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू होणार आहेत.

पुणे: राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आल्यानंतर आता बुधवारपासून शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू होणार आहेत.काही नामांकित महाविद्यालयामधील प्रवेश ऑनलाईन पध्दतीने गुणवत्ता यादीनुसार केले जाणार असले तरी काही महाविद्यालयात प्रवेश थेटपणे प्रवेश दिले जाणार आहेत.गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत गुप्ता म्हणाले,शिक्षण मंडळाने बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केल्यानंतर महाविद्यालयाचे प्रवेश अर्ज महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर भरण्यास उपलब्ध झाले होते.ज्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये 60 ते 70 टक्के गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास थेटपणे प्रवेश दिले जाणार आहेत. महाविद्यालयात बीएस्सीच्या 480 तर बीए अभ्यासक्रमाच्या 240 जागा आहेत.गणेश खिंड येथील मॉर्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय खरात म्हणाले,आमच्या महाविद्यालयात बी.कॉम.च्या 600,बी.ए.च्या 320,आणि बीस्सीच्या 240 जागा आहेत. महाविद्यालयातील प्रवेश अर्ज मंगळवारपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.तसेच प्रथम येणा-या विद्यार्थ्याला प्रथम प्राध्यान्य दिले जाणार आहे. दरम्यान,गरवारे व बीएमसीसी महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एफ.वाय.बी.कॉमर्स मध्ये थेट प्रवेश दिला जणार आहे.तसेच फर्ग्युसन,स.प.आणि बीएमसीसी महाविद्यालयातील प्रवेश केवळ गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत.