शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पहिली पोस्टिंग महापालिकांमध्ये

By admin | Updated: July 9, 2015 03:08 IST

प्रशासकीय सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना (आयएएस) पहिली पोस्टिंग आता महापालिकांमध्ये आयुक्त म्हणून देण्याचे धोरण सरकार आणत आहे. त्या दृष्टीने एक प्रस्ताव नगरविकास विभागाने

अतुल कुलकर्णी  मुंबई प्रशासकीय सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना (आयएएस) पहिली पोस्टिंग आता महापालिकांमध्ये आयुक्त म्हणून देण्याचे धोरण सरकार आणत आहे. त्या दृष्टीने एक प्रस्ताव नगरविकास विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. सध्या नव्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती दिली जाते. २०१४-१५च्या आर्थिक पाहणी निष्कर्षानुसार राज्यात ५० टक्क्यांच्या पुढे नागरीकरण झाले आहे. ३६ जिल्ह्याच्या महाराष्ट्रात ३६ शहरांनी १ लाख लोकसंख्येच्या पुढे मजल मारली आहे. वाढत्या नागरीकरणाने शहरांचे प्रश्न बिकट बनू लागले आहेत. तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या आजूबाजूची गावे शहरात समाविष्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे त्या त्या नगरपालिका, महापालिकांवरील बोजा वाढू लागला आहे. त्यामुळे येत्या काळात पालिकांच्या आयुक्तांवर मोठी जबाबदारी येणार आहे. सध्या असणाऱ्या आयुक्तांच्या कारभारावर मुख्य सचिव, नगरविकास विभाग आणि स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणावे तेवढे समाधानी नाहीत.काही अधिकारी तर त्याच महापालिकेत अधिकारी ते आयुक्त पदापर्यंत गेले. ते दुसऱ्या अधिकाऱ्यांना आपल्या पालिकेत येऊच देत नाहीत. अशी नावेदेखील मुख्य सचिव कार्यालयाने काढली आहेत. तर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतरही ते बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांना आता मेडिकल बोर्डापुढे उभे करण्याची कठोर पावले उचलली जात असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.