शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये सहकार तत्वावरील महाराष्ट्रातील पहिले नाट्यगृह

By admin | Updated: July 6, 2017 15:44 IST

मराठीतील नामवंत आणि दर्जेदार नाटकांची मेजवानी मिळावी यासाठी अलिबागमध्ये अत्याधुनिक नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

रायगड, दि. 6 - अलिबाग आणि एकूणच रायगड जिल्ह्यातील कला, संस्कृती आणि सांस्कृतिक कलाविष्कारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच नाट्य रसिकांसाठी मराठीतील नामवंत आणि दर्जेदार नाटकांची मेजवानी मिळावी यासाठी अलिबागमध्ये अत्याधुनिक नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे. पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाने यासाठी पुढाकार घेत उभारलेल्या नाट्यगृहाचे आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून दिनांक ७ जुलै २०१७  रोजी सकाळी १० वाजता अलिबाग येथील चेंढरे – बायपास या ठिकाणी सोहळा संपन्न होणार आहे.
           
महाराष्ट्राला नाट्यगृह, नाटकं आणि वेगवेगळ्या कलाविष्कारांची, सादरीकरणाची परंपरा आहे. तीच परंपरा रायगड जिल्ह्यातही जपली जात आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र, जिल्ह्यात अत्याधुनिक नाट्यगृहाची कमतरता होती. ही कमतरता भरून काढण्यासाठी पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाने अलिबाग शहरात अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त, देखणे नाट्यगृह बांधण्याची मोहीम हाती घेतली आणि ती आता पुर्णत्वास आणली आहे. या नाट्यगृहाचे लोकार्पण ७ जुलै रोजी विशेष मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून या नाट्यगृहातील व्यासपीठाला ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. नानासाहेब लिमये यांचे नाव देण्यात आले आहे.
 
 आणखी वाचा 
           
अलिबाग शहरातील नाट्यरसिकांसाठी आमदार जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून त्याचबरोबर नृपाल पाटील आणि चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे, या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या नाट्यगृहात स्टेट ऑफ दी आर्ट पद्धतीच्या नऊशे आसनांची बसण्याची व्यवस्था असून नाट्यगृहात जपानच्या टीओए ऑडीयो सिस्टीम्सची व्यवस्था करण्यात आली आहे. उच्च गुणवत्तेच्या आवाजासाठी उत्तम ऑकॉस्टीकल डीफ्युजर्स असून जास्त चांगल्या सादरीकरणासाठी पहिले लाईट - वेट व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सभागृहात जास्त आरामदायी वातावरणासाठी केंद्रीभूत एसी व्यवस्था. कलाकारांसाठी पूर्णपणे सुसज्ज स्टेट ऑफ द आर्ट ग्रीन रुम्स. दुर्मिळ डॉक्युमेंटरीज्साठी व्हिडीयो प्रोजेक्शनची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑकॉस्टीकली ट्रीटेड क्राय रुम्स. टॉप ऑफ द लाईन फायरफायटींग इक्युपमेंटस्. नाटकांच्या तालमींसाठी खुल्या अ‍ॅम्फी थीएटरची व्यवस्था. पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रीनलिफ विद्युत प्रणालीची उत्पादने. श्रोत्यांच्या सोयीसाठी उपहारगृह. ऑनलाईन तिकीट बुकींगची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
 
   
या अत्याधुनिक पीएनपी नाट्यगृहात नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच, संगीत, नृत्य आणि गायनाचे वर्ग घेण्यासाठी सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्यामुळे रायगड जिल्ह्यात सांस्कृतिक चळवळीला एक वेगळी वाटचाल मिळेल. या नाट्यगृहात पहिला कार्यक्रम करण्याचा मान अशोक हांडे यांच्या " मराठी बाणा " या दर्जेदार मराठी कार्यक्रमाला मिळाला आहे शनिवार दिनांक 8 जुलै सायंकाळी 7 वाजता 
" मराठी बाणा " च्या प्रयोगाने ह्या नाट्यगृहाचे उदघाटन होत आहे
 
 

अशोक हांडे यांचा लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने सन्मान

मराठी भाषेचा अभिमान मराठी बाण्याने सांगणारे अवलिया कलावंत अशोक हांडे यांना यंदाच्या परफॉरमिंग आर्ट (Performing Arts) विभागातील "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विधान परिषदेचे विरोधी नेते धनंजय मुंडे, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि भरत दाभोळकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या विभागात निरंजन भाकरे, पूजा गायतोंडे, सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर (महाराज, सप्त खंजिरीवादक कीर्तनकार , अकोला), सुभाष नकाशे(कोरियोग्राफर) यानांही नामांकित करण्यात आले होते. मात्र, जनतेनं अशोक हांडे यांच्या नावाला पसंती दिली आहे.