ऑनलाइन लोकमतबीड, दि. 7 - रामदेव बाबांच्या पतंजलीचा राज्यातील पहिला मॉल सुरू करण्याचा मान बीडला मिळाला असून, रविवारी येथील सुभाष रोडवरील छत्रपती संकुलात सुरू झाले. पतंजलीचे राज्याचे प्रभारी अॅड. श्रीराम लाखे यांच्या संकल्पनेतून हा मॉल सुरू करण्यात आला आहे.नारायणगडाचे ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या हस्ते मॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडित, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे, आदी उपस्थित होते.ग्राहकांना एकाच छताखाली आता पतंजलीचे ४८० प्रॉडक्टस याठिकाणी मिळणार असून, याच ठिकाणी पतंजली चिकित्सालयही कार्यरत राहणार आहे. बीड शहरात पतंजली योग समितीच्या वतीने सतत वेगवेगळे उपक्रम सुरू असतात. सध्या शहरात ३६५ दिवसांचे योग शिबीरही सुरू असून, यालाही बीडकरांचा चांगला प्रतिसाद आहे.
राज्यातील पहिला पतंजली मॉल बीडमध्ये
By admin | Updated: August 7, 2016 19:59 IST