शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पहिला सामना होणार : उर्वरित १९ सामन्यांचे भवितव्य टांगणीला

By admin | Updated: April 8, 2016 02:21 IST

राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवरून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तात्पुरता दिलासा

मुंबई : राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवरून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्याला उच्च न्यायालायाने परवानगी दिली असली तरी उर्वरित १९ सामन्यांचा निर्णय १२ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी खेळपट्टीसाठी वापण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाला दिली. ‘खेळपट्ट्यांची देखभाल करण्यासाठी पाणी द्यायचे नसेल, तर बगिच्यांची देखभाल करण्यासाठीही पाणी देणे थांबविले पाहिजे,’ असे एमसीएच्या वकिलांनी म्हटले. या युक्तिवादावर खंडपीठाने संताप व्यक्त केला. राज्य सरकारने या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय नियोजन केले आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले. आयपीएलला टँकरने पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या स्रोतांची चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. (प्रतिनिधी)राज्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई असताना आयपीएलसाठी एवढे मोठे पाणी टँकरने कसे मिळणार? या टँकरना कोण पाणी देणार? हे प्रश्न राज्य सरकारला पडले नाहीत का? राज्य सरकारने स्वत:हून याची दखल घेऊन महापालिकेकडे आणि एमसीएकडे चौकशी करायला हवी होती, असे ताशेरे खंडपीठाने राज्य सरकारवर ओढले.खासगी विहिरी आणि बोअरवेल ताब्यात घेण्याचा विचार : आवश्यकता भासल्यास खासगी विहिरी आणि बोअरवेलही ताब्यात घेण्याचा विचार सरकार करत आहे. खंडपीठानेही राज्य सरकारला या विचाराबाबत अंतिम निर्णय काय असेल, याची माहिती १२ एप्रिल रोजी देण्याचे निर्देश दिले.