शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पहिले ‘इलेक्ट्रॉनिक्स हब’ हिंजवडीत

By admin | Updated: February 19, 2016 03:37 IST

हिंजवडी आयटी पार्क परिसरात संरक्षण विभागाच्या मागणीनुसार राज्यातील पहिले ‘इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर’ (हब) उभारण्यात येणार आहे.

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात संरक्षण विभागाच्या मागणीनुसार राज्यातील पहिले ‘इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर’ (हब) उभारण्यात येणार आहे. यासाठी वक्फ बोर्डाने सुमारे ३० एकर जागा देण्याची तयारी दाखविली आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.आगामी पाच वर्षांत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स हब’ निर्माण करण्याची घोषणा शासनाने नुकतीच केली. त्यामध्ये सुमारे १२०० कोटी डॉलरच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यभरात या उपक्रमामुळे सुमारे एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या या प्रस्तावाला प्रतिसाद देत पुण्यातील संरक्षण विभागाने पहिले ‘इलेक्ट्रॉनिक्स हब’ हिंजवडी परिसरात उभारण्याची मागणी केली होती. संरक्षण विभागाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा पुरवठा करणारे सुमारे २० ते २५ लघुउद्योग व कारखाने पुण्यातील पर्वती परिसरात आहेत. मात्र, ही जागा कमी पडत असून, वाहतुकीलाही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनविणारे सर्व लघुउद्योग, कारखाने व पुरवठादार कंपन्या एकाच छताखाली उभारण्याची मागणी संरक्षण विभागाने ‘एमआयडीसी’कडे केली होती. त्यावर ‘एमआयडीसी’ने वक्फ बोर्डाकडे जागेचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार बोर्डाने जागा ताब्यात देण्याची तयारी दाखविली आहे. (प्रतिनिधी)