शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

नोटाबंदीनंतर वर्षाच्या पहिल्या दिवशी फक्त ५७ दस्तनोंदणी

By admin | Updated: January 1, 2017 18:41 IST

खामगाव येथे कोणत्याही खरेदी व्यवहारासाठी शुभमुहूर्त अथवा आठवड्यातील दिवसाचे मुहूर्त ठरविले जातात.

ऑनलाइन लोकमत/गिरीश राऊतबुलडाणा, दि. 1 - खामगाव येथे कोणत्याही खरेदी व्यवहारासाठी शुभमुहूर्त अथवा आठवड्यातील दिवसाचे मुहूर्त ठरविले जातात. याच मानसिकतेतून गतवर्षी राज्यात नवीन वर्ष २०१६च्या प्रारंभी १ जानेवारीला तब्बल ४ हजारांचे वर दस्त नोंदणी झाली होती. मात्र यावर्षी नोटबंदीचा परिणाम की काय ही संख्या हजारावरून घसरत शेकडासुद्धा गाठू शकली नाही. यावर्षी नववर्षाचे पहिल्या दिवशी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत फक्त ५७ दस्तऐवजांचीच नोंदणी झाली आहे. शेत, प्लॉट, घर, अशा स्थावर मालमत्तांची खरेदी शासनाच्या महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या महसूल व नोंदणी विभाग अंतर्गत दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत वा आॅनलाइन पद्धतीने केली जाते. राज्याच्या महसुलात भर घालणारा हा महत्त्वाचा विभाग समजला जातो. सन २०१६ आधीची दोन वर्ष दुष्काळाचे असल्याने स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार मंदावले होते. मात्र सन २०१६ मध्ये स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये वाढ झाली होती. गत वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी २०१६ या प्रथम दिवशी राज्यात असणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयात तसेच आॅनलाइन पद्धतीने दुपारी ४.१५ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ५२ एवढी दस्त नोंदणी झाली होती. मात्र यावर्षी हा आकडा घसरून केवळ ५७ वर आला आहे. यावर्षीच्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी २०१७ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत फक्त ५७ दस्तऐवजांची नोंदणी झाली आहे. दस्त नोंदणीचा आकडा पहिल्या वर्षीच्या तुलनेत घसरल्याने प्राप्त महसुलाचा आकडासुद्धा घसरला आहे. १ जानेवारी २०१७ रोजी दस्तनोंदणी केवळ ५७ झाली असल्याने यापासून फक्त ५० लाख रुपये महसूल शासनाला मिळाला. तर गतवर्षी १ जानेवारीला झालेल्या व्यवहारापासून शासनाला २३.९३ कोटी रुपये महसूल मिळाला होता.