शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

पावसाळी सहलींची पहिली पसंत ‘भंडारदरा’ : धबधब्यांचे माहेर

By अझहर शेख | Updated: August 1, 2017 16:07 IST

नाशिक, दि. 1-  मुंबईकर असो की नाशिककर आणि अहमदनगरवासीय पर्यटक पावसाळी सहलीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील 'भंडारदरा' या डेस्टिनेशनला पसंती देत ...

नाशिक, दि. 1-  मुंबईकर असो की नाशिककर आणि अहमदनगरवासीय पर्यटक पावसाळी सहलीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील 'भंडारदरा' या डेस्टिनेशनला पसंती देत आहेत. मुंबईपासून इगतपुरी-घोटी मार्गे नाशिक पासून तर अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर आणि संगमनेर, अकोले मार्गे अहमदनगर वासीयांनाही भंडारदरा जवळचे ठिकाण आहे.

‘विकेण्ड’ला सह्याद्रीच्या कुशीत जणू पर्यटकांची जत्राच भरलेली पहावयास मिळते. या डेस्टिनेशनमध्ये निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे. शाळा, महाविद्यालयीन सहली असो की ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळांचे पर्यटन असो अशा सर्वच वयोगटातील निसर्गप्रेमी पहिली पसंत भंडारदरा परिसराला देताना दिसून येत आहे.

वाऱ्यासह वेगाने कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, परिसराने पांघरलेला हिरवा शालू सह्याद्रीच्या रांगेतील पाबरगड, आजोबा, कळसुबाई शिखर, रतनगड, अलंग-मदन-कुलंग, खुट्टा अशा विविध गडांना चढलेला हिरवाईचा साज अन् या डोंगररांगांवर वरूणराजाकडून सुरू असलेला जलभिषेक त्यामुळे वाहणारे लहान-मोठे धबधबे निसर्गसौंदर्यात अधिकच भर घालतात.

भंडारदरा धरण अर्थात विल्सन डॅम शंभर टक्के भरले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याबररोबरच अम्ब्रेला फॉलही सध्या पर्यटकांच्या दृष्टीस पडत आहे. धरणातून सोडण्यात येणाºया पाण्यामुळे हा फॉल तयार होतो. हा वॉटरफॉल शेंडी गावालगत पहावयास मिळतो.तेथून पुढे रतनवाडी-घाटघरच्या परिसरात भटकंती करताना नाणे वॉटरफॉल, नेकलेस वॉटरफॉल साम्रद जवळील आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या सांदण व्हॅलीमधील रिव्हर्स फॉल तसेच भंडारदरापासून राजूरच्या रस्त्यावर पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रंधा गावालगत असलेल्या श्री घोरपडादेवीच्या परिसरातील रंधा वॉटरफॉलसह नदीचा विस्तीर्ण परिसर आणि मंदिर विश्वस्ताकडून बांधण्यात आलेले लहान-लहान आकर्षक पादचारी पूल तयार करून परिसर विकसीत करण्यात आला आहे. त्यामुळे भंडारदरा ‘ट्रीप’मधील ‘रंधा’ला भेट प्रत्येकाची ठरलेली असते. या भागात येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक आदिवासींना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पर्यटन स्थळावर परिसराती ग्राम विकास समिती व संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे स्थानिक युवकांना रोजगारासाठी विविध खाद्यपदार्थांची विक्री करणे सोपे झाले आहे.