शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत साकारणार जगातले पहिले ‘बुद्धिबळ भवन’

By admin | Updated: January 10, 2017 09:12 IST

विश्वनाथन आनंदपासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामांकित बुद्धिबळपटूंना घडविणा-या सांगलीत लवकरच जगातले पहिले ‘बुद्धिबळ भवन’ साकारले जाणार आहे. २

सांगली, दि. १० -  विश्वनाथन आनंदपासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामांकित बुद्धिबळपटूंना घडविणा-या सांगलीत लवकरच जगातले पहिले ‘बुद्धिबळ भवन’ साकारले जाणार आहे. २५ हजार चौरस फुटातील प्रस्तावित इमारतीस बुद्धिबळाच्या पटाचे स्वरूप देण्यात आले असून, एकाचवेळी पाचशे खेळाडूंच्या स्पर्धेची तसेच आंतरराष्टÑीय सामन्यांची व्यवस्था येथे उपलब्ध होणार आहे.
बुद्धिबळाचे भीष्माचार्य दिवंगत भाऊसाहेब पडसलगीकर यांनी १९४१ मध्ये स्थापन केलेल्या येथील नूतन बुद्धिबळ मंडळाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्य, राष्ट्रीय स्पर्धांची पन्नास वर्षांची अखंड परंपराही या मंडळाने जपल्याने संपूर्ण बुद्धिबळ विश्वात सांगलीचे नाव कोरले गेले आहे. या स्पर्धांमध्ये पाचवेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद, ग्रॅण्डमास्टर के. शशिकिरण, पी. हरिकृष्णा, अभिजित कुंटे, बी. अधिबान, राहुल शेट्टी, आर. बंडोपाध्याय, जयंत गोखले, प्रवीण ठिपसे, एन. सुधाकरबाबू आदी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे सांगली ब्रॅँडिंगसाठी पुढाकार घेतलेल्या सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी बुद्धिबळातील सांगलीची ओळख अधोरेखित करण्यासाठी जगातले एकमेव बुद्धिबळ भवन उभारण्याचा निर्णय घेतला.
भवनासाठीचा प्रस्ताव २८ डिसेंबररोजी क्रीडा संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. मिरजेतील क्रीडा संकुलाच्या जागेत पाचमजली इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. सांगलीचे प्रसिद्ध वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी हा आराखडा केला आहे. सहा कोटी ५८ लाखांचा हा प्रस्ताव आहे. कोणत्याही दिशेने या इमारतीकडे पाहिल्यानंतर बुद्धिबळाचा पट दिसेल, अशी ही रचना आहे. हेलिकॉप्टरमधून खाली पाहिल्यानंतरही एक मोठा पट अंथरल्याचे चित्र दिसणार आहे. आंतरराष्टÑीय सामन्यांसाठी आवश्यक असणारी काचेचे सभागृह, डिजिटल स्क्रीन, पे्रक्षक गॅलरी, प्रेस रुम, कॅन्टीन, निवास व्यवस्था येथे प्रस्तावित आहे. एकाचवेळी पाचशे खेळाडूंना खेळता येईल आणि राहता येईल, अशी रचना करण्यात आली आहे. शासनाच्या मंजुरीनंतर साडेतीन वर्षात ही इमारत उभी राहणार आहे.
 
काय असेल इमारतीत?
पहिल्या मजल्यावर छोट्या खोल्या, खेळाडू, प्रशिक्षकांसाठी निवास व्यवस्था, भाऊसाहेब पडसलगीकर आणि त्यांच्या नूतन बुद्बिबळ मंडळाशी संबंधित संग्रहालय, दुसºया आणि तिसºया मजल्यावर स्पर्धा सभागृह असून तेथे पार्टीशनची सोयही उपलब्ध आहे. चौथ्या मजल्यावरही निवास व्यवस्था आणि कॅन्टीन  होणार असून, सर्वांत शेवटच्या पाचव्या मजल्यावर आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी काचेची खोली आणि त्यासाठी स्वतंत्र लिफ्ट व्यवस्था केली जाणार आहे.
 
भाऊसाहेबांचे स्वप्न साकारणार
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ज्यांनी पूर्ण हयात बुद्धिबळाच्या प्रसारासाठी घालविली, ते भाऊसाहेब पडसलगीकर सांगलीचे भूषण आहेत. त्यांनी पाहिलेले बुद्धिबळाचे स्वप्न आम्ही साकार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. बुद्धिबळात संपूर्ण भारतात सांगलीचे नाव आदराने घेतले जाते. भवन साकारल्यानंतर संपूर्ण जगात सांगलीची नवी ओळख निर्माण होईल.
 
अनोखी संकल्पना
वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी सांगितले की, इमारतीमधील प्रत्येक मजल्यास आणि विभागास आम्ही बुद्धिबळातील प्रचलित शब्दांप्रमाणे नावे दिली आहेत. जगातील कोणत्याही ठिकाणच्या बुद्धिबळाच्या स्पर्धा सांगलीत बसून पाहता येणार असून, येथील स्पर्धांची माहिती आणि प्रक्षेपणही अन्यत्र दाखविता येऊ शकेल. जगात कुठेही बुद्धिबळाच्या पटावर आधारित रचनात्मक इमारत नाही. त्यामुळे जागतिक स्तरावरील देखणी वास्तू सांगलीत साकारणार आहे.