शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट पुण्यासाठी ब्रिटनकडून मदतीची पहिली घोषणा

By admin | Updated: December 28, 2015 01:54 IST

स्मार्ट पुण्याच्या दिशेने एक चांगले पाऊल पडले असून, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पुणे शहराला दीड कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा ब्रिटनकडून

पुणे : स्मार्ट पुण्याच्या दिशेने एक चांगले पाऊल पडले असून, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पुणे शहराला दीड कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा ब्रिटनकडून करण्यात आली आहे. पुढील ३ महिन्यांत हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना भारतातील पुणे, अमरावती (आंध्र प्रदेश), इंदूर ही तीन शहरे स्मार्ट करण्यासाठी मदतीची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी केली. त्याबाबतचे करारही त्या वेळी करण्यात आले. पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटिल असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मदतीची तयारी ब्रिटनने दर्शविली आहे. ब्रिटन राबवित असलेल्या नावीन्यपूर्ण योजनांची माहिती महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना देण्यासाठी, ब्रिटनचे शिष्टमंडळ लवकरच पुण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी अंतर्गत १०० शहरांची निवड केली आहे. त्यामधून पहिल्या टप्प्यासाठी १० ते २० शहरे स्पर्धात्मक पद्धतीने निवडली जाणार आहे. याकरिता पुणे पालिकेने आपला आराखडा नुकताच केंद्र शासनाकडे पाठविला आहे. येत्या २६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यातील स्मार्ट शहरांची निवड जाहीर केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुण्याची निवड निश्चित मानली जात आहे. ही निवड जाहीर होण्यापूर्वीच पुण्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेली पीएमपीच्या व्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी बसचे मार्ग, त्या मार्गावरून धावणाऱ्या बस, त्यांचे वेळापत्रक यासह सर्व प्रकारची तपशीलवार माहिती असलेले अ‍ॅप विकसित करणे. क्षेत्रनिहाय विकास योजनेअंतर्गत मॉडेल एरिया म्हणून निवडण्यात आलेल्या औंध, बाणेर, बालेवाडीमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयोग राबविणे, याकरिता या निधीचा वापर करता येणार आहे. मदतीचा हा पहिला टप्पा असून, यापुढेही पुणे शहरासाठी मदत दिली जाणार आहे, असे ब्रिटन सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.