शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वक्तृत्व स्पर्धेत कल्याणच्या श्रद्धा वझे प्रथम

By admin | Updated: April 27, 2016 03:53 IST

साने गुरु जी वाचनालयाने घेतलेल्या वकृत्त्व स्पर्धेत यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता आपल्या स्पर्धकांनी वकृत्त्वातूनदेखील याच विषयावर भाष्य करणे पसंत केले

ठाणे : साने गुरु जी वाचनालयाने घेतलेल्या वकृत्त्व स्पर्धेत यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता आपल्या स्पर्धकांनी वकृत्त्वातूनदेखील याच विषयावर भाष्य करणे पसंत केले. या स्पर्धेत कल्याणच्या श्रद्धा वझे यांनी बाजी मारली. नेरळच्या दर्पण गाडे यांनी द्वितीय, खारीगावच्या गणेश बिडये यांनी तृतीय क्रमांक पटकाविला तर उत्तेजनार्थ म्हणून कमलाकर गुर्जर व उषा साठे यांची निवड झाली. परिक्षक म्हणून कवी नारायण लाळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी ‘दुष्काळ मानव निर्मित की निसर्ग निर्मित’, ‘इंग्रजी माध्यम आणि डिजिटायझेनचा वाचनालयांवर परिणाम होईल का?’, सन २०१५ मध्ये प्रकाशित झालेले आणि मला आवडलेले पुस्तक आदी विषय दिले होते. स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपला उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला. दुष्काळासाठी माणूस जबाबदार आहे. पूर्वी पूर्ण चार महिने पाऊस पडायचा. आता हे प्रमाणात व्यस्त आणि अनियमति झाले आहे. मध्येच अवकाळी पाऊस येतो. पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याचे नियोजन , सिंचन प्रकल्पांची कल्पकता दाखिवली नाही. वृक्षांची बेसुमार कत्तल, जमिनीची प्रचंड धूप, पाणी वापराबाबतचा बेफिकीरपणा अशा अनेक कारणांमुळे दुष्काळ परत परत येत आहे. भविष्यात पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल. हे भीषण संकट दूर करायचे असेल तर नियोजन आताच केले पाहिजे. प्रत्येकाने सहकार्य आणि शिस्त दाखिवली पाहिजे अशी विविध मते या विषयावर स्पर्धकांनी व्यक्त केली. पहिला दुष्काळ इ.पू, ६४६ साली रोममध्ये पडला होता. त्यानंतर इ,स. ६४२ मध्ये इजिप्तमध्ये पडल्याचीही माहिती दिली. राजेंद्रसिंह यांनी राजस्थानात केलेली जलक्र ांती, पोपटराव पवार,अण्णा हजारे यांनी केलेले शिवारातीला प्रयोग, यांचा आदर्श समोर ठेवून नियोजन करण्यात प्रत्येकाने सहभाग दिला पाहिजे अशी उपाययोजनाही या स्पर्धेतून सुचविण्यात आली. (प्रतिनिधी)