शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आधी खाते क्रमांक, नंतरच मदत!

By admin | Updated: April 21, 2015 00:24 IST

दुष्काळग्रस्त शेतक-यांचा परत गेलेला निधी पुन्हा मागणार.

संतोष येलकर/अकोला : बँक खाते क्रमांकाअभावी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा शासनाकडे परत गेलेला मदतनिधी पुन्हा मागविला जाणार आहे. या मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यापूर्वी राज्यात दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खातेक्रमांकाचा शोध महसूल विभागाकडून घेतला जात आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यात खरीप पिके हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी राज्य शासनामार्फत जिल्हानिहाय मदतनिधी वितरित करण्यात आला. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेली मदत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी मदतनिधी तालुकास्तरावर वितरित करण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याचे काम काम तहसील कार्यालयांकडून करण्यात आले. राज्यातील दुष्काळग्रस्त जिलंमध्ये २0 मार्चपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर मदतनिधी जमा करण्याचे काम महसूल विभागामार्फत करण्यात आले होते. बँक खातेक्रमांक उपलब्ध नसलेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीचा निधी शासनाच्या आदेशानुसार २0 मार्च रोजीच जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत शासनाकडे परत करण्यात आला. बँक खाते क्रमांकाअभावी शासनाकडे सर्मपित करण्यात आलेला मदतनिधी पुन्हा शासनाकडून प्राप्त करण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये संबंधित दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचे बँक खातेक्रमांक प्राप्त करण्याचे काम महसूल यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले. तहसीलनिहाय शेतकर्‍यांचे बँक खातेक्रमांक उपलब्ध प्राप्त झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या मदतीसाठी मदतनिधीची जिल्हानिहाय मागणी करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमांकाअभावी शासनाकडे सर्मपित करण्यात आलेला मदतनिधी आवश्यक असल्याची मागणी शासनाकडे करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत ९ एप्रिल रोजी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना पत्राद्वारे देण्यात आले आहेत. त्यानुसार दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमांकांचा शोध घेतला जात आहे.