शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गोळीबाराने थरारले पूर्णानगर

By admin | Updated: December 11, 2014 00:49 IST

सातारा, फलटण भागात दरोडे टाकून दहशत निर्माण करणा:या प्रकाश चव्हाण या सराईत गुंडाचा दरोडयापासून ते स्वत:ची टोळी स्थापन करण्यार्पयतचा गुन्हेगारी जगताचा प्रवास आहे.

कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याच्या खुनामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता
पिंपरी : सायंकाळच्या वेळेस सर्वच जण निवांत होते.. लहान मुले रस्त्यावर खेळत होती.. तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पा रंगलेल्या.. याच वेळेस गोळ्या झाडल्याच्या आवाजाने पूर्णानगर, चिखली या सुशिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या परिसराची शांतता भंग पावली. आरडाओरडा आणि धावपळ ऐकून काही तरी गडबड झाल्याचे समजताच परिसरातील दुकाने झटक्यात बंद झाली. 
 
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामागे पूर्णानगर ही उच्च मध्यमवर्गीयांची वसाहत आहे. येथे अनेक हौसिंग सोसायटय़ा आहेत. कुख्यात गुंड व माथाडी कामगार नेता प्रकाश चव्हाण याचे संपर्क कार्यालय येथेच आहे. आपल्या खासगी अंगरक्षकासह तो कार्यालयापासून 1क्क् मीटर अंतरावर असलेल्या रॉयल हेअर कॅफे या केश कर्तनालयात दाढी करण्यासाठी आला होता. 
श्रीकृष्ण क्लासिक सोसायटीत तळमजळ्यावर हे वातानुकूलित दुकान आहे. सायंकाळची वेळ असल्याने लहान मुले रस्त्यावर खेळत होती. काही सायकलवर रपेट मारत होती. तरुण मंडळी गप्पांत दंग होती. पावणोसातच्या सुमारास अचानक दुकानाबाहेर गोळ्या झाडल्याचा ठो.. ठो.. असा आवाज झाला. फटाके फुटल्याप्रमाणो हा आवाज होता. लगेचच आरडाओरडा सुरू झाला. त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. जखमींना त्वरित मिळेल त्या वाहनातून रुग्णालयात हलविण्यात आले. रॉयल हेअर कॅफेशेजारचे संगणक, ड्रेस मेटरीअल, किराणा आणि डान्स क्लासच्या गाळ्यांचे शटर त्वरित खाली आली. काही क्षणांत परिसरातील सर्वच दुकाने आणि हॉटेल बंद झाली. नागरिकांनी तेथून काढता पाय घेत घर गाठले. दुकानाच्या चारही बाजूंनी उंच इमारती असलेल्या हौसिंग सोसायटय़ा आहेत. तेथील खिडक्यातून नागरिक डोकावत  होते. 
खबर मिळताच घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला. निळ्या व पांढ:या रंगातील पोलिसांच्या मोटारी व जीपने परिसराला वेढाच घातला. शेजारील रस्त्यावरून वाहतूक बंद केली गेली. घटनास्थळास दोरीचे कठडे करून नाकाबंदी केली गेली. पोलीस अधिका:यांनी व्हॉट्स अॅपवर या बातमीची खबर लगोलग पोहोचवली.  
दुकानाच्या शेजारच्या परिसरात अंधार असल्याने मोबाईलच्या प्रकाशात पाहणी केली जात होती. गोळ्या आणि पुंगळ्याभोवती वतरुळाकार रेखाटन केले गेले. 
लाल रंगाच्या बुटाचा एक जोड आणि सत्तुर पडला होता. कुंडय़ा तुटून जमीनीवर पडल्या होत्या. भेदरलेल्या रॉयलच्या मालकाकडे पोलीस चौकशी केली गेली. तो हिंदी भाषेत उत्तरे देत होता. 
 
घटनाक्रम
4सायंकाळी 6.3क् : दाढी करण्यासाठी चव्हाण केशकर्तनालयात आला.
46.45 : दाढी करून दुकानाबाहेर येताच त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकत  गावठी पिस्तूलातून दहा गोळ्या झाडल्या आणि सत्तूरने वार. चव्हाण आणि तीन अंगरक्षक जखमी
47.1क् : रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चव्हाण याला रुग्णालयात नेले पण तत्पूर्वीच मृत्यू
48.3क् : वायसीएम रुग्णालयात विच्छेदनासाठी मृतदेह दाखल
 
गुंडगिरी, दरोडा ते स्वत:ची टोळी.. प्रकाशचा काळा प्रवास
पिंपरी : सातारा, फलटण भागात दरोडे टाकून दहशत निर्माण करणा:या प्रकाश चव्हाण या सराईत गुंडाचा दरोडयापासून ते स्वत:ची टोळी स्थापन करण्यार्पयतचा गुन्हेगारी जगताचा प्रवास आहे. खून,खूनाचा प्रयत्न, हप्ते वसूली अशा स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल असलेला सराईत गुंड चव्हाण याच्यावर 2क्क्7 मध्ये मोक्का दाखल करण्यात आला होता. राजकीय वरदहस्त लाभल्याने कामगारनेता होण्यार्पयतची मजलही त्याने मारली होती. पिंपरी चिंचवड, मावळ, चाकण, पिरंगुट या औद्योगिक परिसरात कारखान्यांमधील कंत्रटदारीत गुंडगिरीचा शिरकाव झाल्याने कंत्रटे मिळविण्यावरून तसेच वर्चस्व
प्रस्थापित करण्यावरून एकमेकांवरील हल्याच्या घटना वाढल्या होत्या. गोळीबाराच्याही घटना घडत होत्या, चव्हाण या गुंडाची हत्या ही त्याचीच परिणीती मानली जात आहे. 
सातारा जिल्ह्यात तसेच फलटण तालुक्यात 1993 मध्ये त्याने स्वत:चे गुन्हेगारी साम्राज्य पसविण्यास सुरूवात केली. या भागात त्याने दरोडे टाकून दहशत निर्माण केली. त्यानंतर 1994 मध्ये पिंपरी चिंचवडमधील भोसरी लांडेवाडीतील नगरसेवक अनिल हेगडे याच्या खून प्रकरणातील आरोपी म्हणून त्याचे नाव पुढे आले. गुन्हेगारी जगताशी त्याचा सक्रीय सहभाग असल्याचे भोसरीतील हेगडे खून प्रकरणापासून शहरातील नागरिकांच्या लक्षात आले. भोसरी, पिंपरी, निगडी, येरवडा, पौड, पनवेल आदी ठिकाणच्या पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरूद्ध विविध स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल झाले. विविध न्यायालयात ते खटले प्रलंबित आहेत. 2क्क्7 मध्ये संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) त्याच्यावर कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी क्षेत्रतील त्याचा दबदबा वाढत गेला तसा राजकीय आश्रयही त्याला मिळत गेला. राजकीय वरदहस्तामुळे त्याच्यावरील मोक्काअंतर्गतची  कारवाई स्थगित होण्यास मदत झाली. 
राजकीय नेत्यांकडून आश्रय मिळत गेल्याने 2क्क्8 मध्ये त्याला कामगार संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. औद्योगिक क्षेत्रत कमाईला वाव आहे, हे लक्षात घेऊन 2क्1क् मध्ये त्याने असंघटित कामगारांसाठी स्वत:ची संघटना स्थापन केली. त्या माध्यमातून त्याने औद्योगिक क्षेत्रत चागंलाच जम बसवला. 2क्क्7 मध्ये  महापालिका निवडणुकीच्या रिंगणातही त्याने नशिब अजमावले. त्यात अपयश आल्याने गुन्हेगारी आणि कामगार क्षेत्रतच त्याने लक्ष केंद्रित केले. गवळी टोळीशी काही काळ त्याचे नाव जोडले गेले होते, परंतू अलिकडच्या काळात त्याने टोळी स्थापन करून गुन्हेगारी जगतात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. पिंपरी, निगडी, अजंठानगर, भोसरी, पिंपरी या भागात त्याने गुन्हेगारीचे जाळे पसरवले होते. 
 
पोलिसांनी पिंजून काढला परिसर
निळा दिव्याच्या मोटारीत पोलीस उपायुक्त राजेंद्र माने हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सलाम टोकत अधिकारी व कर्मचारी माहिती देत होते. एक गोळीचा मोबाईलमध्ये फोटो घेतला. पोलीस पथकाची पाहणी सुमारे दोन तास सुरूच होती. या कालावधीत इतर पोलिसांनी परिसर पिंजून काढला. काही पथके मागावर निघून गेली. 
परिसरात तणाव पसरला होता. येणारे जाणारे कानोसा घेत होते. बघ्यानी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मोबाईलवरुन मित्रमंडळीना दिली जात होती. गॅलरी व खिडकीतून डोकावत रहिवाशी पोलिसांची गतीविधी निरखत होते. जवळचे असलेल्या चव्हाण याचे संपर्क कार्यालय बंद होते. स्मशान शांततेशिवाय तेथे कोणीच नव्हते. 
रुग्णालयात गर्दी
दरम्यान, चिंचवडच्या खासगी रुग्णालयातून चव्हाण याना संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रात्री साडेआठच्या सुमारास नेल्याचे समजात अनेक कार्यकर्ते व हितचिंतक तेथे दाखल झाले. शेकडो जणांनी ‘डेड हाऊस’ परिसरात गर्दी केली होती. नातेवाईक महिला रडत होत्या. नेते मंडळी हात बाहेर करीत होते. तणावग्रस्त स्थितीत सर्वच थांबले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास तेथून मृतदेह पुण्याकडे हलविण्यात आल्याने गर्दी हळूहळू पांगली.