शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

येऊरच्या हॉटेलमध्ये गोळीबार करणा-याचा परवाना रद्द होणार

By admin | Updated: July 18, 2016 20:55 IST

वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने येऊरच्या एका हॉटेलमध्ये हवेत गोळीबार करण्याचा उद्दामपणा करणा:या रविंद्र पांडुरंग नलावडे (39, रा. डिसुझावाडी, वागळे इस्टेट) याचा शस्त्रपरवाना

- जितेंद्र कालेकर

ठाणे, दि.१८ -  वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने येऊरच्या एका हॉटेलमध्ये हवेत गोळीबार करण्याचा उद्दामपणा करणा:या रविंद्र पांडुरंग नलावडे (39, रा. डिसुझावाडी, वागळे इस्टेट) याचा शस्त्रपरवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वर्तकनगर तयार केला आहे. तो पोलीस आयुक्तांकडे पाठविला जाणार असून त्यानंतर तो रद्द करणार असल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी ह्यलोकमतह्ण ला दिली.येऊरच्या साई ढाबा या हॉटेलमध्ये रविंद्रची त्याच्या काही मित्रंसमवेत मद्य आणि जेवणाची पार्टी रविवारी रंगली होती. याच पार्टीत ते मद्याच्या आहारी पूर्णपणे झिगांट  झाल्यामुळे पार्टीचा पारा चांगलाच चढला होता. अगदी सैराट स्टाईलने त्यांनी हवेत गोळीबार करीतच आपला वाढदिवस साजरा केला. रविवारी दुपारी 4 वा. च्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळताच वर्तकनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावित यांनी भेट देऊन नलावडेला रात्री अटक केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ठाणो न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.नलावडे याला व्यवसायाच्या कारणास्तव 8 सप्टेंबर 2011 रोजी ङ्म्रीनगर पोलीसांच्या शिफारशीवरुन तत्कालीन पोलीस आयुक्तांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना दिला आहे. त्याची मुदत 8 सप्टेंबर 2019 रोजी संपणार आहे. त्याच्यावर काही गुंडांनी वारही केले आहेत. त्याच्या गळयावरही जबर वार झालेला आहे. त्याच्यावरील धोका लक्षात घेऊनच त्याला स्वसंरक्षणासाठी हा परवाना दिला होता, अशी माहिती ङ्म्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली. येऊरमध्ये त्याने केलेल्या या गोळीबाराच्या पाश्र्वभूमीवर आता ते रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्तांकडे पाठविणार असल्याचेही ते म्हणाले.स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळालेला असतांना एखाद्या पार्टीत अत्यंत बेमुर्वत, बेफिकीरपणो आणि एखाद्याच्या जीवाला धोका होईल अशा त:हेने हवेत गोळीबार करणा:या नलावडेचा शस्त्र परवानाच रद्द करण्याचा प्रस्ताव आता तयार करण्यात येणार असल्याचे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गावीत यांनीही सांगितले. तर असा प्रस्ताव आल्यानंतर तो तातडीने पोलीस आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठवून परवाना रद्द केला जाणार असल्याचे उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी सांगितले. वर्षभरातील दुसरी घटनायेऊरमध्ये साधारण वर्षभरात गोळीबार होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही नोव्हेंबर 2015 मध्ये राजेश अहिरे या भिवंडीच्या कोनगाव पोलीस ठाण्यातील हवालदारानेही त्याठिकाणी हवेत गोळीबार केल्याची चर्चा रंगली होती. परंतू, चौकशीत मात्र तो गोळीबार अन्य कोणीतरी केल्याचे उघड झाले. अर्थात, अहिरेकडे शस्त्र परवाना असल्यामुळे त्याची चौकशीही पोलिसांनी केली होती. त्यानंतर येऊरमधील विनापरवाना चालणारे हॉटेल्स वर्तकनगर पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने बंद केले होते. आता पुन्हा गोळीबार झाल्यामुळे हॉटेल चालकांवर अनेक निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रंनी दिली.