शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

मेकर टॉवरमध्ये अग्नितांडव

By admin | Updated: October 19, 2016 06:59 IST

मेकर टॉवर या उत्तुंग इमारतीच्या विसाव्या मजल्यावर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला.

मुंबई : दक्षिण मुंबईतील कफ परेड येथील मेकर टॉवर या उत्तुंग इमारतीच्या विसाव्या मजल्यावर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला. बजाज इलेक्ट्रिकल या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज यांच्या आलिशान फ्लॅटमध्ये ही आग लागली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करीत या आगीतून बजाज कुटुंबीयांसह ११ जणांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र या दुर्घटनेत बजाज यांच्या घरातील दोन घरगडी मृत्युमुखी पडले. मेकर टॉवरच्या ए विंगमध्ये ही दुर्घटना घडली. मुंबईतील महत्त्वाच्या उत्तुंग इमारतींपैकी एक असलेल्या या इमारतीत काही आठ बीएचकेचे ड्युप्लेक्स फ्लॅट बनवले आहेत. त्यातील विसाव्या मजल्यावर बजाज यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. सकाळी आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत आग वेगाने पसरत २१ व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आग विझवण्याबरोबरच फ्लॅटमध्ये मजल्यापर्यंत पोहोचली होती. घरातील वस्तू, फर्निचर, इलेक्ट्रिक वायरिंग, फॉल्स सीलिंगला आगीने वेढले. त्यामुळे आग विझवण्याबरोबरच फ्लॅटमध्ये अडकलेल्या बजाज कुटुंबीयांना बाहेर काढण्यासाठी जवानांची एक तुकडी कार्यरत होती. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी तीन रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या होत्या. बजाज कुटुंबीयांसह ११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, या आगीत बजाज यांचे दोन घरगडी गुदमरून मृत्युमुखी पडले. प्रदीपवीर कुंदन (२२), अजय कुमार पासवान (३२ वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले, तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना तत्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा अंत झाला होता. आगीनंतर संपूर्ण बिल्डिंग तातडीने रिकामी करण्यात आली. परिसरातील वाहतुकही थोड्या वेळासाठी बंद करण्यात आली होती. (प्रतिनिधी)>असा होता आलिशान फ्लैट : २५ मजल्यांच्या मेकर टॉवरमधील आलिशान फ्लॅट एखाद्या बंगल्याहून कमी नाहीत. बजाज यांचे चार बीएचकेचे दोन फ्लॅट होते. आतून जोडून घेऊन ते आठ बीएचकेचे केले होते. आतूनच वरच्या मजल्यावर जाण्याची सोय होती. ही इमारत उत्तुंग असल्याने अग्निशमन दलास विशेष स्नोर्कल लावून मदतकार्य करता आले. शॉर्टसर्किटमुळे आग? : घटनास्थळी अग्निशमन दलाचे दहा बंब, पाण्याचे सहा टँकर होते. फ्लॅट क्रमांक २०१ व २११ मधील सात रहिवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारानंतर घरी सोडले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.>महापालिका आयुक्तही घटनास्थळी या इमारतीमध्ये श्रीमंत, उद्योगपती व सेलिब्रिटी राहतात. या घटनेची माहिती मिळताच आयुक्त अजय मेहता स्वत: घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाकडून पूर्ण अहवाल मागविला आहे. या इमारतीमधील अग्निशमन उपकरणे व यंत्रे कार्यरत होती. त्याच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात मदत झाली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शॉर्टसर्किटमुळे आग? घटनास्थळी अग्निशमन दलाचे दहा बंब, पाण्याचे सहा टँकर होते. फ्लॅट क्रमांक २०१ व २११ मधील सात रहिवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारानंतर घरी सोडले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कूलिंग आॅपरेशननंतर या घटनेची चौकशी सुरू केली जाईल.