शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

‘सनबर्न’च्या स्टेजला आग

By admin | Updated: January 3, 2017 04:48 IST

वादाच्या भोवऱ्यात अडकूनसुद्धा केसनंद येथील जोगेश्वरी डोंगरावर झालेल्या सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलच्या मुख्य स्टेजच्या डेकोरेशन सेटला आग

पुणे : वादाच्या भोवऱ्यात अडकूनसुद्धा केसनंद येथील जोगेश्वरी डोंगरावर झालेल्या सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलच्या मुख्य स्टेजच्या डेकोरेशन सेटला आग लागून ते पूर्णपणे खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२च्या सुमारास घडली. सेट काढताना फॅब्रिकेशनची ठिणगी उडून थर्माकॉल आणि लाकडावर पडल्याने आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.सनबर्न फेस्टिव्हलला होत असलेला विरोध झुगारत २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान ते पार पडले. फेस्टिव्हल संपल्यानंतर मुख्य स्टेज काढण्याचे काम चालू होते. लोखंडी रॉड काढण्याचे काम चालू असताना फॅब्रिकेशनची ठिणगी स्टेजच्या उजव्या बाजूला असणाऱ्या थर्माकॉल आणि लाकडी डेकोरेशनवर पडली. भर उन्हामध्ये ठिणगी पडल्याने थर्माकॉलच्या डेकोरेशनने तत्काळ पेट घेतला. अर्ध्या तासात स्टेजची अर्धी बाजू खाक होत असताना तेथील कामगारांनी दुसऱ्या बाजूकडील शक्य होईल तेवढे थर्माकॉलचे डेकोरेशन, वायरिंग आणि लाकडी वस्तू बाजूला केल्या. अर्ध्या तासाच्या अग्नितांडवानंतर स्टेजच्या दुसऱ्या बाजूला आग लागली असताना अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. स्टेजचा काही भाग शिल्लक असताना अग्निशामक दलाच्या जवानांनी १५ मिनिटांच्या आत सर्व आग आटोक्यात आणली. मात्र धूर आणि लाकडातील धुसमूस सुरू होती. या वेळी पाण्याची कमतरता भासल्याने दीड वाजता आगीने पुन्हा एकदा जोर धरून उर्वरित स्टेज जाळून खाक केले. (प्रतिनिधी)