शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयास आग

By admin | Updated: June 9, 2016 01:53 IST

बोरीभडक (ता. दौंड) येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयास आग लागून सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले

यवत : बोरीभडक (ता. दौंड) येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयास आग लागून सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किट होऊन आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ही घटना काल (दि. ७) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.औद्योगिक केंद्राचे प्रभारी प्राचार्य संजय वाळुंज यांनी दिलेली अधिक माहिती अशी : मंगळवारी (दि. ७) रात्री साडेनऊ वाजता कार्यालयास आग लागल्याचे कळताच, आम्ही तेथे धाव घेऊन प्रथम वीजपुरवठा बंद केला. अग्निशमन दल पुणे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून आगीचा बंब बोलावला. दरम्यान, औद्योगिक केंद्रात असणारी अग्निशमन यंत्रणा वापरून तसेच पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग शेजारील रूममध्ये पसरून नुकसान होऊ नये, म्हणून रूम मोकळ्या केल्या. तसेच रूमच्या कार्यालयाबाहेर असलेली मारुती झेन गाडी दूर नेऊन लावली. काही वेळाने अग्निशमन दलाची गाडी आल्याने आग विझविण्याचे काम जोरदारपणे सुरू केल्याने रात्री १ वाजण्याच्यादरम्यान आग आटोक्यात आली. आगीमध्ये कार्यालयातील टेबल, खुर्च्या, फर्निचर, लोखंडी कपाटे यामधील कागदपत्रे, पाच संगणक, झेरॉक्स मशीन, लॅमिनेशन मशीन, वातानुकूलित यंत्रणा यांसह कपाटातील ५०० मुलांचे सन २००७ पासून ते आजअखेरपर्यंतची ओरिजनल कागदपत्रे, निकालपत्रे, व्यवसाय उत्तीर्ण प्रमाणपत्रे, केंद्राला मिळालेल्या विविध व्यवसाय सुरू करण्यास मिळालेली मंजुरीपत्रे, औद्योगिक केंद्राचा संस्था आणि शासन यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराची कागदपत्रे, शिक्षकांची सेवापुस्तके, पर्सनल फाईल, कॅशियरच्या कपाटात असलेले रोख २० हजार रुपये आदी सर्व जळून खाक झाले. >आगीचे वृत्त कळताच आज (दि. ८) सकाळी १० वाजता आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे संस्थेचे मानद सचिव छत्रपती मालोजीराजे, खजिनदार अजय पाटील, मानद सहसचिव संजय शिंदे यांनी औद्योगिक केंद्रास भेट देऊन जळिताची पाहणी केली. कार्यालयात असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमुळे कोणतीही अडचण होणार नाही व यामुळे शैक्षणिक अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल, असे छत्रपती मालोजीराजे यांनी सूचित केले.