शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

आगीतून फुफाट्यात--लगाव बत्ती---

By admin | Updated: September 25, 2014 21:42 IST

गुडघ्याला बाशिंग बांधून अवघ्या मंडपभर नाचणाऱ्या इच्छुक नवरदेवांच्या पोटरीत गोळा आला.

आगीतून फुफाट्यातअखेर ‘महायुती’चा ‘घट’स्फोट. शेवटी युती तुटलीच, अशा ब्रेकिंग न्यूज टी.व्ही. चॅनल्सवरून झळकू लागल्या, तसं गुडघ्याला बाशिंग बांधून अवघ्या मंडपभर नाचणाऱ्या इच्छुक नवरदेवांच्या पोटरीत गोळा आला. माहेरच्या लोकांना लाथाडून प्रेमविवाहासाठी घराबाहेर पडल्यानंतर प्रेयसीला प्रियकरानं सांगावं की, ‘बाईऽऽगं आता इथंच थांबू. आपण नाही बुवा करणार तुझ्याबरोबर लग्न!’ ...त्यावेळी तिची जी अवस्था होईल, अगदी डिट्टोऽऽ तस्साऽऽ मॅटर आयाराम-गयारामांचा झाला. एखादीनं सारा जुना संसार कोनाड्यातल्या ट्रंकमध्ये गुंडाळून नवीकोरी भगवी पैठणी नेसावी; तिला नंतर कळावं की या साडीला पदरच नव्हता. तेव्हा जशी ती हतबल होईल, तशी अगतिकता या भगव्या इच्छुकांनी गुरुवारी दिवसभर अनुभवलेली. महाबळेश्वरमधील आलिशान हॉटेलच्या थंडगार खोलीत थेट मुख्यमंत्र्यांशी मोबाईलवरून बोलणाऱ्या बावळेकरांना कठून कल्पना सुचली, कुणास ठाऊक? हातात भगवा दोरा अन् पायात प्रचाराची भिंगरी बांधून बिच्चारे डी.एम. आमदारकीची स्वप्नं बघण्यात गुंग झाले. मात्र, ब्रेकिंग न्यूजनं त्यांची झोप उडालेली. ‘आमदारकी राहू दे, महामंडळाचा लालदिवा तरी मिळतोय की नाही?’ या विवंचनेत म्हणे त्यांचं वजन किलो-दोन किलोनं कमी झालेलं. (नाही तरी त्यांना डाएटींगची गरज होतीच!)खंडाळ्याचे पुरुषोत्तम शिवसेनेतून भाजपात आले; पण आजची परिस्थिती पाहता ‘आगीतून फुफाट्यात!’ या म्हणीची त्यांना आज शंभरवेळा तरी आठवण झाली. रामराजेंचे ‘माजी समर्थक’ अन् सेनेचे ‘आजी तालुकाप्रमुख’ काकडे यांनी तर म्हणे रामराजेंनाच जाऊन विचारलं की, ‘महाराज...महायुती तुटल्यानंतर फलटणमधल्या सेनेला किती तोटा होणार?’ तेव्हा रामराजे म्हणाले की,‘कधी फायदा होणार होता?’ खरंतर, मिरजेच्या तासगावकरांसोबत राहून-राहून काकडेंनीही ‘शेजारधर्म’ पाळलेला... पण राजकीय आडाखे बांधण्यात गणित चुकलेलं. सगळ्यात भारी काम मात्र, शेखरभाऊ अन् रणजित भैय्यांनी केलेलं. ‘भाजप’ अन् ‘रासप’च्या ‘ग्रुप’मध्ये उघड-उघड जॉईन न होता, गुपचूपपणे पसर्नल ‘चॅटींग’वरच त्यांनी भर दिलेला. त्यामुळं ते दोघे मात्र आज दिवसभर चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न करत असले तरी आतून मात्र, भलतेच धास्तावलेले. साताऱ्यात आता ‘दगडू विरोधात दीपक’ची फाईट निवांतपणे काठावर बसून ‘बाबाराजे’ बघत बसतील, असा होरा ‘अदालतवाड्यात’ शिवाजीकाकांनी व्यक्त केलेला. त्याचवेळी समोरच्या बंगल्यात चोरगे म्हणे ‘आप’ली एक चूक निस्तरण्याच्या नादात पुन्हा ‘बाणा’ची दुसरी चूक केली की काय, या जाणिवेनं अस्वस्थ झालेले. सगळ्यात भारी संवाद ‘कृष्णा’काठच्या दोन भोसलेंमध्ये रंगलेला. ‘मदन’दादा मोठ्या कौतुकानं ‘अतुल’बाबांना म्हणाले म्हणे की, ‘माझ्यासारखी थोडी सहनशीलता दाखविली असतीस तर काय बिघडलं असतं काय? राजकारणातले अनेक टक्के-टोणपे खाल्ल्यामुळंच मी कधी माझ्या मनातलं बाहेर येऊ देत नसतो. मग समोर कितीही जवळचा विश्वासू कार्यकर्ता असू दे!’सचिन जवळकोटे