शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

हेलिकॉप्टरमधून फेकला आगीचा गोळा!

By admin | Updated: April 9, 2016 03:23 IST

जमिनीपासून अवघ्या दीडशे ते दोनशे फुटांवरून जंगलात आगीचे गोळे फेकणाऱ्या ‘त्या’ हेलिकॉप्टरमधून पुसला प्रकल्पातही आगीचा धगधगता गोळा फेकण्यात आला

वरूड (जि. अमरावती) : जमिनीपासून अवघ्या दीडशे ते दोनशे फुटांवरून जंगलात आगीचे गोळे फेकणाऱ्या ‘त्या’ हेलिकॉप्टरमधून पुसला प्रकल्पातही आगीचा धगधगता गोळा फेकण्यात आला. मात्र, तो पाण्यात पडल्याने स्फोट झाला नाही. पुसला प्रकल्पालगतच्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी-शेतमजुरांनी ही माहिती गुरुवारी पोलीस व वनविभागाच्या चौकशी पथकाला दिली. त्यामुळे या घटनेचे गूढ अधिकच गहिरे झाले आहे.हेलिकॉप्टरमधून जंगलात आगीचे गोळे पडल्याने वरूड वनपरिक्षेत्रातील २५ एकर जंगल बेचिराख झाले. बुधवारी दुपारी घडलेला हा प्रकार परिसरातील काही ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहिला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे.जमिनीच्या अगदी जवळ आलेल्या हेलिकॉप्टरमधून बुधवारी दुपारी आगीचे गोळे खाली फेकल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाल्याचे व परिसरात धुराचे लोळ उठल्याचे प्रत्यक्षदर्शी वनमजूर चरण पाटील यांनी सांगितले. आगीचे गोळे फेकणारे ते पांढऱ्या रंगाचे हेलिकॉप्टर मध्यप्रदेश सीमेतून आल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी चौकशी पथकाला दिली.राज्यासह राज्याबाहेरील सर्व एव्हिएशन सेंटर्स व विमानतळांना माहिती देऊन रडारवरून हे हेलिकॉप्टर कोठून आले, याची माहिती घेण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणेने देखील या घटनेची दखल घेतली असून यासंदर्भात वनविभाग आणि पोलीस यंत्रणा उच्चस्तरीय चौकशी करीत आहे. > मध्यप्रदेश सीमेवरून पांढऱ्या रंगाचे हेलिकॉप्टर बुधवारी अत्यंत कमी उंचीवरून घिरट्या मारत होते. त्यातून आगीचा गोळा पुसली प्रकल्पात फेकण्यात आला. परंतु हा गोळा पाण्यात पडल्याने त्याचा स्फोट झाला नाही. पुढे हे हेलिकॉप्टर वाईकडे निघून गेले.- अविनाश डकरे, शेतकरी, पुसलीपांढरे हेलिकॉप्टर कोठून व कशासाठी आले?, आगीचे गोळे फेकण्याचे कारण नेमके काय?, याचा शोध युद्धस्तरावर घेतला जात आहे. - दादाराव काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरूड