शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय कार्यालयांमधील अग्निरोधक यंत्र ‘आउटडेटेड’!

By admin | Updated: July 8, 2016 00:23 IST

२0१२ पासून अग्निरोधक यंत्रात ‘रिफिलिंग’च नसल्यामुळे आगीचा धोका कायम.

सुनील काकडे / वाशिमविविध कारणांमुळे लागणारी आग वेळीच आटोक्यात यावी, यासाठी प्रशासकीय कार्यालये, शासकीय वसतिगृहे, सिनेमा हॉल्स यासह इतर सार्वजनिक स्थळी अग्निरोधक यंत्रे बसविण्यात आली; मात्र सन २0१२ पासून या यंत्रांची 'रिफिलिंग' झाली नसल्याचे विदारक वास्तव असून प्रशासकीय कारभारातील गलथानपणा यामुळे चव्हाट्यावर आला आहे.राज्याच्या कारभाराचा गाडा जेथून हाकला जातो, त्या मुंबईच्या मंत्रालयात २१ जून २0१२ मध्ये भीषण आग लागली होती. त्यात चौथा, पाचवा आणि सहावा मजला पूर्णत: जळून खाक होण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या फाइल्स बेचिराख झाल्या होत्या. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून राज्य शासनाने सर्व जिल्हय़ांमधील प्रशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, रेल्वेस्थानक, बसस्थानक, दवाखाने यासह नागरिकांची सदोदित गर्दी असणार्‍या इतर ठिकाणी अग्निरोधक यंत्रे बसवून देखभाल, दुरुस्तीकडे वेळोवेळी लक्ष पुरविणे गरजेचे होते; मात्र अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमधील एकाही प्रशासकीय कार्यालयात आगीच्या घटनांपासून बचावाकरिता कुठलीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. काही प्रशासकीय कार्यालयांमध्ये ड्राय पावडर टाइप फायर एक्सटिंग्युशर बसविण्यात आले; मात्र सन २0१२ पासून या यंत्रांची ह्यरिफिलिंगह्ण झालेली नाही. ४ वर्षांचा मोठा कालावधी उलटूनही या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आगीचा धोका कायम लागून असल्याचे चित्र आहे. शासकीय निवासस्थानांमध्ये ९ वर्षांपासून रिफिलिंगला कोलदांडा!वाशिम येथील शासकीय निवासस्थानांमध्ये सन २00७ मध्ये फायर एक्सटिंग्युशर बसविण्यात आले; मात्र तेव्हापासून आजतागायत ९ वर्षांच्या मोठय़ा काळादरम्यान या यंत्रांची रिफिलिंगच झाली नाहीत. यासह समाजकल्याण विभागांतर्गत चालविल्या जाणार्‍या शासकीय वसतिगृहांमध्येही असाच प्रकार आढळून आल्याने ही ठिकाणेदेखील संभाव्य धोक्याच्या वतरुळात अडकलेली आहेत.