शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

औषधाच्या दुकानाला आग

By admin | Updated: November 2, 2016 01:09 IST

पाबळ फाटा परिसरातील गणेश फार्मा या औषधांच्या होलसेल दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील सर्व माल व इतर वस्तू जळून खाक झाल्या.

शिरूर : येथील पाबळ फाटा परिसरातील गणेश फार्मा या औषधांच्या होलसेल दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील सर्व माल व इतर वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत अंदाजे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकानाचे मालक सुनील सावळेराम पानमंद यांनी म्हटले आहे.पानमंद यांच्या मालकीचे गणेश फर्मा हे दुकान आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुकानात लक्ष्मीपूजन करून त्यांनी दुकानबंद केले व ते घरी गेले. पहाटे साडेतीनच्या सुमारास या दुकानासमोर राहणाऱ्या डॉ. मनीषा चोरे यांनी पानमंद यांना त्यांच्या दुकानाच्या खिडकीतून धूर बाहेर येत असल्याचे सांगितले. यावर पानमंद यांनी लगेच दुकानाकडे धाव घेतली. या वेळी दुकानाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. पानमंद दुकानाजवळ पोहोचण्याआधीच पोलीस व अग्निशामक दलाला तेथे उपस्थित नागरिकांपैकी एकाने भ्रमणध्वनीवरून माहिती दिली होती. यामुळे अग्निशामक दलाने तेथे येऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत दुकान पूर्णत: जळून खाक झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या वेळी पानमंद यांनी दिलेल्या माहितीनुसार दुकानातील मोठ्या प्रमाणावर असलेला औषधांचा साठा, दोन नवीन संगणक, तीन जुने संगणक, दुकानाचे फर्निचर, फ्रीज, पंखे, फिल्टर (वॉटर), इर्न्व्हटर या सर्व वस्तू आगीत भस्मसात झाल्या. अंदाजे सव्वातीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पानमंद यांनी यावेळी सांगितले. आग शॉटसर्किटमुळे लागली असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.>डॉ. चोरे हॉस्पिटलसमोर असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावर पानमंद यांचे तीन गाळे एकत्र करून एक मोठा गाळा तयार केला होता. हे तीन गाळे दुमजली आहेत.औषधांची होलसेल विक्री असल्याने या गोडाऊनप्रमाणे असणाऱ्या गाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरऔषधांचा साठा होता. हा सर्व साठा आगीत जळून खाक झाला.या गाळ्यांव्यतिरिक्त आजूबाजूलाही सुदैवाने आग पसरली नाही. येथे खाली गाळे व वरती तीन मजल्यावर फ्लॅट आहेत.