शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरीत मेडीकल दुकानाला आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू

By admin | Updated: June 30, 2016 08:48 IST

मुंबईत अंधेरी पश्चिमेला मेडीकल दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये आठ जण होरपळून ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० -  मुंबईत अंधेरी पश्चिमेला एका मेडीकल दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये एक पुरुष, दोन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. यात एक तीन महिन्यांचा मुलगी आहे. कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या महिलेचाही मृत्यू झाला आहे. या महिलेला आधी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.   
 
वायरलेस रोडवरील जुहू गल्लीतील निगम मिस्त्री चाळीत वाफा मेडीकल स्टोअर हे दुकान आहे. तीन मजली इमारतीत तळ मजल्यावर दुकान आणि वरच्या दोन मजल्यावर रहिवासी रहात होते. गुरुवारी सकाळी ६.२० च्या सुमारास मेडीकल दुकानात आग भडकल्यानंतर वरच्या मजल्यापर्यंत ही आग पसरली. 
 
वरच्या दोन मजल्यावरील खोल्यांमध्ये १७ ते १८ जण रहात होते. अत्यंत दाटी-वाटीची जागा असल्यामुळे आग लागल्यानंतर सर्वांना लगेच खाली उतरता आले नाही. त्यात इमारतीच्या पाय-याही छोटया होत्या. त्यामुळे काही जणांचा भाजून तर, काहींचा गुदमरुन मृत्यू झाला.  या आगीत एकाच कुटुंबातील चार ते पाच जण ठार झाल्याची शक्यता आहे. 
 
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडया तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तीन फायर इंजिन आणि दोन वॉटर टँकर घटनास्थळी पाठवण्यात आले. तासाभरात सकाळी साडेसात वाजता ही आग विझवण्यात आली. 
 
शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे असे मुंबई पोलिसांचे जनसंर्पक अधिकारी अशोक दुधे यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी अविनाश सिंगणकर किरकोळ जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला. 
 
दुर्घटनेतील मृतांची नावे

साबुरीया मोझीन खान (५२) सिद्दीक खान (३५) राबिल खान (२८) मोझहेल खान (८) उन्नीहय खान (५) अलीझा खान (४) तुब्बा खान (८) अल्ताझ खान (३ महिने)

साबिया खान ही २८ वर्षीय महिला ४५ टक्के भाजली असून तिला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 
 
 
 
{{{{twitter_post_id####}}}}